इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये पहिला क्वालिफायर सामना रविवारी (१० ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. शेवटच्या षटकात महेंद्रसिंग धोनीच्या झंझावाती फलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने ४ गडी राखून सामना जिंकला. या विजयासह सीएसके अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. धोनीने ६ चेंडूत १८ धावा केल्या. या सामन्यात आणखी एक खास गोष्ट होती.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, स्टेडियममध्ये १०० हून अधिक कॅमेरे लावण्यात आले होते. जेणेकरून प्रेक्षकांना मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्याचे आणि प्रत्येक शॉटचे ३६०-डिग्री दृश्य बघायला मिळेल. हे सर्व कॅमेरे 4k रेकॉर्डिंग करणारे होते (३६० डिग्री व्हिजन कॅमेरे). त्यांच्या मदतीने प्रेक्षकांना क्रिकेट नव्या रंगात पाहण्याची संधी मिळाली.
दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील या सामन्यात पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने ६० धावांची खेळी खेळली. यादरम्यान ७ चौकार आणि ३ षटकार मारले. सामना सुरू असताना शॉचे सर्व षटकार ३६० डिग्री व्हिजनद्वारे दाखवले गेले. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच प्रेक्षकांना प्रत्येक कोनातून शॉट पाहण्याची संधी मिळाली.
https://twitter.com/CowCorner9/status/1447220405408702471
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉ (६०) आणि कर्णधार रिषभ पंत (५१) यांनी दमदार अर्धशतक झळकावले. दिल्लीने निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, चेन्नईने २ चेंडू शिल्लक असताना ६ गडी गमावून १७३ धावा करत सामना जिंकला.
चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ५० चेंडूत ७० धावा केल्या. गायकवाडने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले. त्याला रॉबिन उथप्पाने चांगली साथ दिली. रॉबिन उथप्पाने महत्त्वपूर्ण खेळी करत ४४ चेंडूत ६३ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात फटकेबाजी करत विजयश्री खेचून आणली.
महत्त्वाच्या बातम्या –
“… म्हणून मी नेतृत्व सोडले”; स्वतः विराटने केला खुलासा
टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच खेळतील ‘हे’ ७ भारतीय क्रिकेटर, पाहा नावे