सोमवारी (११ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेत एलिमिनेटर सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही संघ आमने सामने असणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालिफायर २ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना करेल.
गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यामुळे हा संघ आपल्या सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतो. तर कोलकाता नाईट रायडर्स संघ देखील बरोबरीची टक्कर देण्यासाठी मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतो.
तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीचा सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यासाठीचा ड्रीम इलेव्हेन संघ कसा असेल?
सामन्याबद्दल अधिक माहिती
सामना – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, एलिमिनेटर
दिनांक – ११ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण – शारजहा क्रिकेट स्टेडियम, शारजहा
या सामन्यासाठी असा असू शकतो कोलकाता नाईट रायडर्सचा संभावित ११ खेळाडूंचा संघ
शूबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, ओएन मॉर्गन (कर्णधार),दिनेश कार्तिक ( यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, सुनील नरेन,शिवम मावी, लोकी फर्ग्युसन, वरुन चक्रवर्ती.
या सामन्यासाठी असा असू शकतो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संभावित ११ खेळाडूंचा संघ
विराट कोहली ( कर्णधार) देवदत्त पडीक्कल, केएस भारत (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डीविलियर्स, शाहबाज अहमद, डॅनियल क्रिस्टियन, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल
या सामन्यासाठी हे ११ खेळाडू असू शकतात ड्रीम ११ संघात
यष्टीरक्षक – केएस भारत
फलंदाज – देवदत्त पडीक्कल, नितीश राणा, शुबमन गिल
अष्टपैलू खेळाडू – ग्लेन मॅक्सवेल, व्यंकटेश अय्यर, शकीब अल हसन
गोलंदाज – हर्षल पटेल, लोकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल
कर्णधार – व्यंकटेश अय्यर
उपकर्णधार – हर्षल पटेल
महत्त्वाच्या बातम्या –
“… म्हणून मी नेतृत्व सोडले”; स्वतः विराटने केला खुलासा
टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच खेळतील ‘हे’ ७ भारतीय क्रिकेटर, पाहा नावे






