---Advertisement---

दसुन शनाकाने ठोकले CPL मधील सर्वात वेगवान शतक, रसेल-हेटमायरचा विक्रम मोडला

On: शुक्रवार, सप्टेंबर 4, 2026 11:39 AM
---Advertisement---

कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) सुरू होऊन 14 वर्षे झाली आहेत, तरीही या टी20 लीगमध्ये कोणत्याही फलंदाजाला 40 चेंडूंपेक्षा कमी चेंडूत शतक झळकावता आले नव्हते. पण 3 सप्टेंबर 2026 च्या रात्री हा विक्रम अखेर मोडला गेला. पहिल्यांदाच एका फलंदाजाने सीपीएलमध्ये 40 चेंडूंच्या आत शतक पूर्ण केले. ही कामगिरी श्रीलंकेचा माजी कर्णधार दसुन शनाका याने केली. त्याने आंद्रे रसेलसारख्या दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढत इतिहास घडवला.

सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सकडून खेळताना सेंट लुसिया किंग्सविरुद्ध, दसुन शनाकाने अवघ्या 39 चेंडूंत शतक ठोकले. सीपीएलच्या इतिहासातील हे सर्वात जलद शतक ठरले आहे. यापूर्वी तीन वेळा फलंदाजांनी 40 चेंडूंत शतके झळकावली होती, परंतु शनाकाने त्या सर्वांना मागे टाकले.

श्रीलंकेच्या या अष्टपैलू खेळाडूने 43 चेंडूंत 121 धावांची नाबाद आणि धडाकेबाज खेळी करत सीपीएलमध्ये खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे, तो 10व्या षटकात फलंदाजीला आला होता आणि तरीही त्याने शतक झळकावण्याची कामगिरी करून दाखवली.

याआधी सीपीएलमध्ये तीन वेळा फलंदाजांनी 40 चेंडूंत शतके केली होती. 2018 मध्ये आंद्रे रसेलने ही कामगिरी सर्वप्रथम केली होती, त्यावेळी तो लीगच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठरले होते.

त्यानंतर, 2025 मध्ये टिम सायफर्टने 40 चेंडूंत शतक करत रसेलच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. काही दिवसांपूर्वीच शिमरॉन हेटमायरनेही 40 चेंडूंत शतक झळकावले होते. मात्र, आता दसुन शनाकाने अवघ्या 39 चेंडूंत शतक पूर्ण करून या तिन्ही दिग्गजांना मागे टाकले आहे.

10व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सला दुसरा धक्का बसला होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दसुन शनाकाच्या वादळी खेळीच्या जोरावार संघाने 235 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

236 धावांचे कठीण आव्हान गाठताना ‘सेंट ल्युसिया किंग्स’ला 100 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. संपूर्ण संघ अवघ्या 98 धावांत बाद झाला. परिणामी, संघाला 137 धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---