पुणे | पूना फुटबॉल लीगच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्राच्या अभूतपूर्व यशामुळे अत्यंत आनंद झालेल्या पूना क्लबच्या सभासदांनी अशा प्रकारच्या अनेक क्रीडा स्पर्धा घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तसेच,सभासदांच्या याच उत्साहाचा परिणाम म्हणून पूना क्लब तर्फे तिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग(पीसीएफएल) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूना क्लब येथील मैदानावर 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2018 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पुना क्लबच्या फुटबॉल विभागाचे सचिव मनीष मेहता व स्पर्धा संचालक तारिक परवानी यांनी सांगितले कि, हि फुटबॉल लीग स्पर्धा केवळ क्लबच्या सभासदांसाठीच मर्यादित आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी स्पर्धा संचालक तारिक परवानी, तांत्रिक संचालक उमेश पिल्ले, स्पर्धा सहाय्यक समीर मास्तर, क्रिएटिव्ह निधी पिल्ले, स्पर्धा व्यवस्थापक पवित पठेजा, स्पॉन्सरशीप टीमचे अक्षय चांदीरामानी यांचा समावेश आहे.
तसेच,सभासंदाच्या समितीमध्ये पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील, क्लबचे उपाध्यक्ष नितीन देसाई, क्लबच्या केटरिंग व स्पॉन्सरशीपचे चेअरमन सुनील हांडा, पुना क्लबच्या फुटबॉल विभागाचे सचिव मनीष मेहता, पुना क्लबचे स्पोर्टस चेअरमन शशांक हळबे यांचा समावेश आहे.
स्पर्धेत झाल्टन ऑफ स्विंग(मनप्रीत उप्पल), गेट मेस्सी(हरसिह सोळंकी), आऊट ऑन बेल(अक्षय चोपडा व अमित पोकर्णा), रोनाल्डो नट्स(अमित गढोके), रॉनी ट्यून्स(राकेश नवनी), सुअरेज बाईट्स(नितीन लुंकड), मार्क ओ पिर्लो(अमजद अक्कलकोटकर व अँड्री पिंटो), ऍबसुलेटली फॅब्रिगेस(आर्यन मेहता), ड्युक्स ऑफ हजार्ड(अली हाजी), शुगर केन(चिराग लुल्ला व अर्णव लुल्ला), कोक इन कॅन(नीरज अरोरा व विशाल कस्तीया) विझार्ड ऑफ ओझील(अमर शेंभे).हे 12 संघ झुंजणार आहेत.
या सपर्धेला मेश को-वर्कचे शार्दूल सिंग बायस प्रायोजकत्व लाभले असून टीआरएनए इंडियाचे जिग्नेश कारिया यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ असून प्रत्येक संघात 8 खेळाडूंचा समावेश आहे.
तसेच, हि 5-अ-साईड स्पर्धा असून 3 खेळाडू राखीव असणार आहेत. सामन्याचा पूर्वार्ध व उत्तरार्ध प्रत्येक 12.30मिनिटांचा असून तीन मिनिटांचे मध्यंतर असणार आहे. प्रत्त्येक संघात 1 मालक व 1 सहमालक असे दोन खेळाडूंची परवानगी आहे. इतर खेळाडू 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेतून निवडले जाणार आहेत.
हि संपूंर्ण स्पर्धा व्यावसायिक पंच व तांत्रिक अधिकाऱ्यांकडून संचालित केली जाणार आहे. या स्पर्धेबरोबरच मुले व प्रौढांसाठी अन्य करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. तसेच, महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याचेही अखेरच्या दिवशी आयोजन केले जाणार आहे.
कार्यकारिणी सदस्यांसाठीही एका सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. अल्पोपहार, खाद्यपेय, डीजे म्युजिक व लाईव्ह कॉमेंटरी, यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी फुटबॉल महोत्सवाचे च वातावरण निर्माण करण्याचा आयोजकांचा हेतू आहे.