---Advertisement---

टीम इंडियाने विंडीज विरुद्ध सामना तर जिंकलाच पण मालिकेतही घेतली विजयी आघाडी

On: शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2019 7:27 PM
---Advertisement---

गुरुवारी (14 नोव्हेंबर) गयाना (Guyana) येथे भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडीज महिला (Indian Womens vs West Indies Women) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना (3rd T20 Match) पार पडला.

या सामन्यात भारतीय महिला संघाने 7 विकेट्सने (Won By 7 Wickets) विजय मिळवला. तसेच, भारतीय महिला संघाने या मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात विंडीजच्या महिलांनी दिलेल्या 59 धावांचे आव्हान भारतीय महिलांनी केवळ 16.4 षटकांमध्ये पूर्ण केले.

भारताकडून खेळताना जेमीमाह रोड्रिगेजने (Jemimah Rodrigues) सर्वाधिक 40 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये तिच्या 4 चौकारांचा समावेश होता. तर, कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) (7), दिप्ती शर्मा (Deepti Sharma) (7) आणि स्म्रिती मंधाना (Smriti Mandhana) (3) यांनी भारताच्या विजयात हातभार लावला.

विंडीजकडून गोलंदाजी करताना हॅले मॅथ्यूज (Hayley Matthews) आणि ऍफी फ्लेचरने (Afy Fletcher) अनुक्रमे 2 आणि 1 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजकडून चीडीन नेशन आणि चिनले हेन्रीने प्रत्येकी 11-11 धावा केल्या. त्याचबरोबर, शेनेता ग्रिमाॅंडने 8, स्टेसी एन किंगने 7, अनिसा मोहम्मदने 6 धावा केल्या. ऍफी फ्लेचर पूनम यादवच्या गोलंदाजीवर शून्य धावेवर बाद झाली. तसेच वेस्ट इंडीजच्या इतर महिला फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू राधा यादव आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर, पूनम यादव आणि अनुजा पाटीलने प्रत्येकी 1 विकेट घेत सामना जिंकण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

आता भारतीय महिला विरुद्ध विंडीज महिला संघात रविवारी (17 नोव्हेंबर) चौथा टी20 सामना गयाना येथे पार पडणार आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---