क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांचे नाव जोडले जाणे हे काही क्रिकेट चाहत्यांसाठी नवीन नाही. आजपर्यंत अनेक क्रिकेटपटूंची नावे बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडली गेली. यात युवराज सिंग, रवी शास्त्री विराट कोहली, सुरेश रैना अगदी एमएस धोनीही यासाठी अपवाद ठरला नाही. धोनीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही वर्षात त्याचेही नाव काही अभिनेत्रींबरोबर जोडले गेले. परंतु नंतर २०१० मध्ये धोनीने साक्षी सिंग रावत हिच्याशी लग्न केले आणि या चर्चांना पुर्णविराम लागला. परंतु लग्नापूर्वी त्याचे बॉलिवूडमधील ४ अभिनेत्रींशी संबंध असल्याची चर्चा होती. या लेखात त्या ४ अभिनेत्रींविषयीच जाणून घेऊया.
दीपिका पादुकोण (Deepika Padukone)
या यादीत बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचे पहिले नाव आहे. धोनी आणि दीपिकाचे नाव खूप चर्चेत होते आणि त्यांच्यातील नात्याबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. तसेच अशीही बातमी समोर आली होती की स्वत: एमएस धोनीने दीपिकाबरोबरचे आपले संबंध सार्वजनिकपणे उघड केले होते आणि तो तिचा मोठा चाहता असल्याचे सांगितले होते.
धोनी आणि दीपिकाच्या नात्यांबद्दल सर्वांना माहित होते मात्र, लवकरच त्यांच्या ब्रेकअपची बातमीही समोर आली आणि त्यानंतर दोघेही कधी एकत्र आले नाहीत. यानंतर दीपिकाने आपले लक्ष बॉलिवूडकडे वळवले. तसेच तिने नोब्हेंबर २०१८ ला रणवीर सिंगशी लग्न केले.
प्रीती सायमन (Preeti Simon)
प्रीती सामयन हे नाव तसे पाहिले तर जास्त चर्चेत नव्हतं. पण काही वेळासाठी धोनीचे नाव कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोची निर्माती आणि लेखक प्रीती सायमन हिच्याशीही जोडले गेले होते. धोनी प्रीतीला गुप्तपणे डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
राय लक्ष्मी (Rai Lakshmi)
बोल्ड स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राय लक्ष्मी हिचेही नाव धोनीसोबत जोडले गेले होते. लक्ष्मीने ज्युलि-२ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिच्या बोल्ड स्टाईलने कहर केला होता.
२००९ मध्ये स्वत: राय लक्ष्मीने ही मान्य केले होते की तीचे एमएस धोनीशी संबंध आहेत. पण धोनी या नात्याबद्दल काहीच बोलला नाही आणि काही दिवसानंतर हे नातं संपलं. राय लक्ष्मीने नंतर धोनीविषयी मीडियामध्ये अशी काही विधाने केली. जी धोनीच्या चाहत्यांना अजिबात आवडणार नाहीत.
असिन (Asin)
धोनीचे नाव बॉलिवूड अभिनेत्री असिनशीही जोडले गेले होते. आमिर खान सोबत तीने गजनीमध्ये काम केले आहे. धोनी आणि असिनच्या प्रेमसंबधातील बातम्या खूप चर्चेत आल्या होत्या. धोनीला आयपीएल २०१० च्या उपांत्य सामन्यापूर्वी असिनच्या घराबाहेर बघितले गेले होते. त्यानंतर त्यांच्यातील संबधाची बातमी जोरात पसरली होती. पण नंतर काही दिवसातच धोनीने साक्षीबरोबर लग्न केल्याने या चर्चा थांबल्या.