20-20 प्रकारात चौकार-षटकारांच्या मदतीने धावा करणारे अनेक फलंदाज असतात. काही खेळाडू तर पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा प्रयत्न करतात. पण तांत्रिक दृष्ट्या सर्वच सलामीवीर यात सक्षम असतात असे नाही. लवकरात लवकर जास्त धावा बनवणे हा प्रत्येक फलंदाजाचा प्रमुख उद्देश्य असतो. याने प्रेक्षकांचे मनोरंजन देखील होते. भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि शिखर धवन पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करण्यास सक्षम आहेत. याशिवाय विविध संघांचे सलामीवीर आक्रमक फलंदाजी करताना दिसतात.
या लेखात आपण माहिती घेणार आहोत अशा चार स्लामीवीरांची, ज्यांनी टी20 सामन्यांच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक षटकार लगावले आहेत.
4. पॉल स्टर्लिंग
आयर्लंडच्या या फलंदाजाने यादीत चौथे स्थान पटकावले आहे. आत्तापर्यंत त्याने वेगवेगळ्या आंतराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या पहिल्या षटकांमध्ये षटकारांचा वर्षाव केला आहे. त्याने आतापर्यंत पहिल्या षटकात एकूण आठ षटकार लगावले आहेत. दरम्यान त्याने 208 चेंडूंचा सामना केला आहे.
3. मार्टिन गप्टिल
न्यूझीलंडच्या आक्रमक सलामीवीर मार्टिन गप्टिलला या यादीत तिसरे स्थान मिळाले आहे. त्याने आपल्या टी20 कारकिर्दीमध्ये विविध सामन्यात पहिल्या षटकात आतापर्यंत एकूण नऊ षटकार ठोकले आहेत. यासाठी त्याने 246 चेंडूंचा सामना केला आहे. अजून एक षटकार लगावला तर त्याला या यादीत वरचे स्थान मिळू शकते.
2. ड्वेन स्मिथ
वेस्ट इंडीजसाठी खेळणाऱ्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. विविध टी20 सामन्यात खेळताना त्याने पहिल्या षटकात आत्तापर्यंत 103 चेंडूंचा सामना करत नऊ षटकार लगावले आहेत. या यादीत त्याने दुसरे स्थान पटकावले असून अजून एक षटकार मारला तर तो यादीत पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो.
1. कॉलिन मुनरो
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॉलिन मुनरो हे नाव प्रसिद्ध आहे. झटपट धावा करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. मुनरोने विविध टी20 सामन्यात पहिल्याच षटकात 9 षटकार लगावले आहेत. सर्वात कमी चेंडू घेऊन त्याने ही कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याने या यादीत ड्वेन स्मिथला मागे टाकत प्रथमस्थान पटकावले आहे. मुनरोने केवळ 79 चेंडूत 9 षटकार लागावले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळण्याची अपेक्षा होती; ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूने व्यक्त केली खंत
हुश्श! टीम इंडियातील ‘त्या’ तिघांचा क्वारंटाईन कालावधी एकदाचा संपला, सराव सत्रात झाले सहभागी
लंकादहन केल्यानंतर ३ भारतीय क्रिकेटर धरणार इंग्लंडची वाट, ‘अशी’ राहिलीय त्यांची प्रथम श्रेणी कामगिरी