---Advertisement---

लंकादहन केल्यानंतर ३ भारतीय क्रिकेटर धरणार इंग्लंडची वाट, ‘अशी’ राहिलीय त्यांची प्रथम श्रेणी कामगिरी

On: रविवार, जुलै 25, 2021 7:29 AM
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत उतरेल. तत्पूर्वी, भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. शुबमन गिल पाठोपाठ वेगवान गोलंदाज आवेश खान व अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हे पहिल्या सराव सामन्यात दुखापतग्रस्त होऊन मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यांचे पर्याय म्हणून सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल व सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडला पाठवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हे तिन्ही खेळाडू पुढील चोवीस तासात इंग्लंडला रवाना होतील.

इंग्लंड दौऱ्यावर निवड झालेल्या या खेळाडूंच्या प्रथमश्रेणी कारकीर्दीविषयी आपण जाणून घेणार आहोत.

पृथ्वी शॉ-
भारताचा युवा सलामीवीर असलेला पृथ्वी शॉ यापूर्वी भारतीय संघाकडून खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत ५ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना ९ डावात ४२.३७ च्या सरासरीने व १ शतकाच्या मदतीने ३३९ धावा काढल्या आहेत. पृथ्वीच्या प्रथमश्रेणी कारकिर्दीचा विचार केल्यास २५ सामन्यांत ५१.४३ च्या लाजवाब सरासरीने २२६३ धावा जमवल्या असून यामध्ये ९ शतके व १० अर्धशतकांचा समावेश आहे.

सूर्यकुमार यादव-
मागील अनेक वर्षापासून देशांतर्गत क्रिकेट गाजवणारा मुंबईचा अनुभवी सूर्यकुमार यादव याला देखील या इंग्लंड दौऱ्यासाठी बोलविण्यात आले आहे. अकरा वर्षापूर्वी प्रथमश्रेणी पदार्पण केलेल्या सूर्यकुमारने आतापर्यंत ७७ सामने खेळत ४४.०१ च्या सरासरीने ५३२६ धावा कुटल्या आहेत. त्याने काही वर्ष मुंबईचे नेतृत्व देखील केले होते. याच वर्षी त्याने मार्च महिन्यात भारताकडून टी२० आणि नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पण केले होते.

देवदत्त पडिक्कल-
मागील दोन वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकसाठी धावांचा रतीब घालणार्‍या देवदत्त पडिक्कलने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. २१ वर्षीय पडिक्कलने आतापर्यंत १५ प्रथमश्रेणी सामने खेळताना ३४ च्या सरासरीने ९०७ धावा जमवल्या आहेत. आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे त्याची श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या टी२०त मैदानात उतरताच शिखरच्या नावे जमा होणार नकोसा विक्रम, रोहित पडेल मागे

किवीचा ‘हा’ फलंदाज आहे ‘कोहली भक्त’, विराटची बॅट घेऊन उतरला मैदानात

कडक ना भावा! चेन्नईच्या ‘या’ पठ्ठ्याने टीपीएल स्पर्धेत ९ चौकार अन् ५ षटकारांसह चोपल्या ९५ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---