---Advertisement---

किवीचा ‘हा’ फलंदाज आहे ‘कोहली भक्त’, विराटची बॅट घेऊन उतरला मैदानात

On: शनिवार, जुलै 24, 2021 10:17 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. तसेच तो कर्णधार म्हणूनही हिट आहे. त्यामुळे जगभरात त्याचे असंख्य चाहते आहेत. यामध्ये अनेक क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. या यादीत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे.

विराट कोहलीचा चाहता दुसरा तिसरा कोणी नसून न्यूझीलंड संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलेन आहे. फिन एलेन सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ लीगमध्ये बर्मिंघम फोईनिक्स संघाकडून खेळत आहे. त्याने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने बर्मिंघम फोईनिक्स संघाची जर्सी परिधान केली आहे. तसेच त्याच्या हातात एक बॅट देखील आहे. (Finn Allen poses with Virat kohli’s bat while being part of the hundred)

तसं पाहायला गेलं, तर हा एक साधा सरळ फोटो दिसून येत आहे. परंतु जेव्हा तुम्ही हा फोटो झूम कराल, तेव्हा तुम्हाला या फोटोतील वैशिष्ट्य जाणवेल. त्या बॅटच्या खालच्या भागावर विराट कोहली असे लिहिले आहे. हा फोटो पाहून हे तर निश्चित झाले आहे की, फिन एलेन हा विराट कोहलीच्या बॅटने खेळत आहे.

https://www.instagram.com/p/CRqenmWt8Ov/?utm_source=ig_web_copy_link

फिन एलेन हा इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळतो. परंतु त्याला आयपीएल स्पर्धेत अजूनर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. जेव्हा जोश फिलिपने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याच्याऐवजी फिन एलेनला संघात स्थान देण्यात आले होते. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात तो खेळताना दिसून येणार की नाही, याबाबत कुठलाही खुलासा केला गेला नाही.

तसेच ‘द हंड्रेड’ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. पहिल्या सामन्यात तो अवघ्या ११ धावा करत माघारी परतला आहे. परंतु कर्णधार मोइन अलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर बर्मिंघम फोईनिक्स संघाने हा सामना ३ गडी राखून आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-माही नव्या इनिंगला करणार सुरुवात, प्रशिक्षण क्षेत्रात ठेवणार पाऊल; पाकिस्तानातून भविष्यवाणी

-विराट-सचिनच्या तुलेनवर भडकला पाकिस्तानी क्रिकेटर; म्हणे, ‘अशी निरर्थक गोष्ट करणे थांबवा’

-भुर्रर्र! श्रीलंकेतील भारताचे ३ शिलेदार ‘मिशन इंग्लंड’ करणार फत्ते, येत्या ‘इतक्या’ तासांत भरणार उड्डाण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---