---Advertisement---

कडक ना भावा! चेन्नईच्या ‘या’ पठ्ठ्याने टीपीएल स्पर्धेत ९ चौकार अन् ५ षटकारांसह चोपल्या ९५ धावा

On: शनिवार, जुलै 24, 2021 9:22 PM
---Advertisement---

भारतातील प्रसिद्ध क्रिकेट लीग पैकी एक ‘तामिळनाडू प्रीमियर लीग २०२१’ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अशातच आज (२४ जुलै) झालेल्या एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाच्या युवा यष्टीरक्षक फलंदाजाने तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा एन जगदीशन या स्पर्धेत तुफानी खेळी करत आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पार पडलेल्या,चेपॉक सुपर गिलिज विरुद्ध नेल्लाई रॉयल किंग्स यांच्यातील सामन्यात एन जगदीशनने अवघ्या ७० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ९५ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर चेपॉक सुपर गिलिज संघाला २० षटकाअखेर १६५ धावा करण्यात यश आले होते. (N Jagdeesan scores 95 runs in just 70 balls in TNPL)

चेपॉक सुपर गिलिज संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना, चेपॉक सुपर गिलिज संघाकडून प्रदोष पॉलने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली, तर सलामीवीर फलंदाज बाबा अपरिजितने संघाला चांगली सुरुवात करून देत ५५ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर चेपॉक सुपर गिलिज संघाने हा सामना ७ गडी आणि २ चेंडू शिल्लक असताना आपल्या नावावर केला.

एन जगदीशनची कारकीर्द
एन जगदीशन आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ५ सामने खेळले आहेत. यात त्याला १६.५ च्या सरासरीने ३३ धावा करण्यात यश आले आहे. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३९.१ च्या सरासरीने ११७४ धावा केल्या आहेत. तसेच लिस्ट ए कारकिर्दीत त्याने २८ सामन्यात ३६.० च्या सरासरीने एकूण १००७ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-माही नव्या इनिंगला करणार सुरुवात, प्रशिक्षण क्षेत्रात ठेवणार पाऊल; पाकिस्तानातून भविष्यवाणी

-विराट-सचिनच्या तुलेनवर भडकला पाकिस्तानी क्रिकेटर; म्हणे, ‘अशी निरर्थक गोष्ट करणे थांबवा’

-भुर्रर्र! श्रीलंकेतील भारताचे ३ शिलेदार ‘मिशन इंग्लंड’ करणार फत्ते, येत्या ‘इतक्या’ तासांत भरणार उड्डाण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---