---Advertisement---

AFGvsIND: अभिषेक शर्माने ऐतिहासिक शतक झळकावत उद्ध्वस्त केले रोहित-शिखरचे रेकॉर्ड्स, विराट कोहलीची केली बरोबरी

On: शुक्रवार, सप्टेंबर 18, 2026 10:18 AM
---Advertisement---

गुरूवारी (17 सप्टेंबर) दिल्लीत अभिषेक शर्माच्या वादळाने अफगाणिस्तानला सळो की पळो करून सोडले. मालिकेतील तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताच्या सलामीवीराने तुफानी शतकी खेळी करत अनेक विक्रमांना मागे टाकले. अफगाणिस्तान विरुद्ध भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या टी 20 सामन्यात भारताने 127 धावांनी विजय मिळवला.

पाहुण्या संघाचे श्रेय अभिषेकबरोबर भारतीय गोलंदाजांनाही जाते. या सामन्यात अभिषेकने 34 चेंडूंत 9 चौकार आणि 11 षटकारांच्या सहाय्याने 108 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 317.65 एवढा होता. हे त्याचे टी 20 क्रिकेटमधील दहावे आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील तिसरे शतक ठरले आहे.

अभिषेकच्या या धमाकेदार शतकी खेळीमुळे अनेक विक्रम मोडले गेले, तर अनुभवी फलंदाज विराट कोहलीचा विक्रम धोक्यात आला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अभिषेकने केवळ 30 चेंडूंतच 100चा आकडा पार केला. यामुळे तो टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतकी खेळी करणारा भारतीय खेळाडू ठरला. तसेच तो टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पूर्ण सदस्य संघासाठी (कसोटी खेळणारा देश) सर्वात जलद शतकी खेळी करणारा खेळाडू ठरला.

टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जलद शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर तीन खेळाडूंनी 30 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आहे. पहिल्या स्थानी एस्टोनियाचा साहिल चौहान (27 चेंडू) आणि दुसऱ्या स्थानी तुर्कीचा मोहम्मद फहाद (29 चेंडू) आहे. आता तिसऱ्या स्थानावर अभिषेक आला आहे.

अभिषेककडून विराटच्या विक्रमाची बरोबरी
अभिषेक टी 20 क्रिकेटमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक शतके करणारा भारतीय
खेळाडू ठरला आहे. त्याने विराटच्या 10 शतकांची बरोबरी केली आहे. संजू सॅमसन, केएल राहुल आणि रोहित शर्मा या भारतीय खेळाडूंनी क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये प्रत्येकी आठ शतके केली आहेत.

अभिषेकच्या आधी भारतासाठी टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होता. रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते.

टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अभिषेक सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 59 सामन्यांमध्ये 1858 धावा करत माजी सलामीवीर शिखर धवनला मागे टाकले आहे. धवनने 58 सामन्यांमध्ये 1759 धावा केल्या. (Abhishek Sharma shattered Rohit Sharma and equaled Virat Kohli’s record with 30 balls century vs AFG 3rd T20I)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---