वनडे क्रिकेटमध्ये शतकांचे बरेच मोठे विक्रम आहेत. सर्वात जास्त शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (४९) नावावर आहे. त्याच्या पाठोपाठ ४३ शतकांसह विराट कोहली आहे. येत्या काळात तो सचिनचा सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम मागे टाकण्याची शक्यता आहे.
पण हे विक्रम सर्वांनाच माहित आहेत. मात्र शतकांचा असा एक विक्रम आहे जो खूप कमी जणांना माहित आहे तो म्हणजे एकाच वनडे सामन्यात ४ खेळाडूंनी शतके करण्याचा. अशा घटना वनडेमध्ये दोनदा झाल्या आहेत. यातील एका सामन्यात भारतीय संघाचाही समावेश आहे. या लेखात या दोन सामन्यांचा आढावा घेतला आहे. एका
१. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया – लाहोर १९९८
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १० नोव्हेंबर १९९८ रोजी लाहोरमध्ये तीन वनडे सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाकडून इजाज अहमदने (Ijaz Ahmed) १०९ चेंडू १११ धावा आणि मोहम्मद युसुफ (Mohammad Yousuf) १११ चेंडू १०० धावा केल्या. पाकिस्तान संघाने या २ शतकांच्या मदतीने ८ बाद ३१५ धावा केल्या.
त्यानंतर प्रतिउत्तर देताना ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) नाबाद १२९ चेंडू १२४ धावा ठोकल्या आणि ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याने १०४ चेंडू १०३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या २ शतकांच्या मदतीने ४८.५ षटकांत चार गडी गमावून ३१६ धावांचे लक्ष्य गाठले.
या सामन्यात रिकी पॉन्टिंगने सामनावीराचा पुरस्कार मिळवला.
२. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – नागपूर २०१३
३० ऑक्टोबर २०१३ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात सामन्यांच्या मालिकेतील सहावा सामना नागपुर येथे खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियानकडून कर्णधार जॉर्ज बेलीने (George Bailey) ११४ चेंडू १५६ धावा आणि शेन वॉटसनने (Shane Watson) याने ९४ चेंडू १०२ धावा केल्या. या २ शतकांच्या मदतीने ऑस्ट्रेलिया संघाने ६ गाड्यांच्या मोबदल्यात ३५० धावांचा विशाल डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघातील विराट कोहली (Virat Kohli) ने ६६ चेंडू नाबाद ११५ धावा आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) ने १०२ चेंडू १०० धावा केल्या. या २ शतकांच्या मदतीने भारतीय संघाने ४९.३ षटकांत ४ गडी गमावून विजय मिळविला. नाबाद शतकी खेळीसाठी विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
वाचनीय लेख –
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया
असा देवमाणूस; ज्याने भारतीय संघाला शिकवले सामने जिंकण्याचे सायन्स
…जेव्हा अंपायर हातात स्टंप घेऊन भारतीय प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढत होते