कोणत्याही कर्णधारासाठी आपला अंतिम 11 खेळाडूंचा संघ निवडणे हे खूपच आव्हानात्मक काम असते, काही खेळाडूंना त्याच्या मागील उत्तम कामगिरीमुळे संधी द्यावी लागते तर काही खेळाडूंनी खराब प्रदर्शन केले असले तरी त्यांच्यावर विश्वास दाखवावा लागतो. कसोटी सामन्यात तर अंतिम 11 जणांचा निवडणे अजूनही आव्हानात्मक होऊन जाते कारण कसोटी क्रिकेटचा असा प्रकार आहे ज्यात सामन्याची परिस्थिती प्रत्येक दिवशी बदलत असते .
भारतीय क्रिकेट संघाचा विचार केल्यास विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील अंतिम 11 जणांच्या संघात कायम बदल केलेला आपणांस दिसून येईल. कोहली वेगवेगळ्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध वेगळवेगळे संघसंयोजन वापरून समतोल करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याने बऱ्याच सामन्यात भारतीय संघाला फायदा झालेला आहे, परंतु काही वेळा कोहलीचे निर्णय त्याच्या अंगाशी आलेले आहेत ,आज या लेखात आपण अशाच 4 वादग्रस्त निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत….
4) कर्ण शर्माला आश्विन आणि जडेजाच्या जागी खेळवणे :- ( ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2014)
भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या अनुपस्थितीत 2014 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात नेतृत्व करीत असलेल्या विराट कोहलीने अंतिम 11 जणांच्या संघामध्ये कर्ण शर्माला संधी देऊन सर्वाना धक्का दिला होता. अनुभवी रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन यांच्याऐवजी नवख्या कर्ण शर्माला संधी देऊन कोहलीने आश्चर्यचकित केले होते . कर्ण शर्मा या सामन्यात फलंदाजीत प्रभाव दाखवू शकला नाही तर गोलनंदाजीतही बऱ्याच धावा देऊन त्याला 4 विकेट्स मिळवता आल्या. या सामन्यात दोन्ही डावात कोहलीने शानदार शतक लगावली परंतु, तरीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि नंतर उर्वरित सामान्यांसाठी अश्विनला पुन्हा संधी देण्यात आली.
3) रोहित शर्माला पुजाराच्या जागी 3 क्रमांकावर खेळवणे :-
धोनीच्या निवृत्तीनंतर नियमित कर्णधार विराट कोहलीने कसोटी सामन्यात आक्रमक फलंदाजांना संधी देण्याचे धोरण राबवले होते. 2015 मध्ये जास्तीत जास्त सामन्यात कोहलीने पुजाराच्या जागी रोहित शर्माला संधी दिली होती. परंतु रोहित शर्माला फलंदाजीत आपला प्रभाव दाखवता आला नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने पुन्हा रोहितच्या ऐवजी पुजाराला संधी दिली होती.
2) अजिंक्य राहाणेच्या जागी रोहित शर्माला संधी देणे :-
साल 2018 च्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध पहिल्या सामन्यासाठी एक मोठा निर्णय घेऊन कोहलीने भारताचा उपकर्णधार रहाणेला डच्चू देण्याचा निर्णय घेतला. विदेशात शानदार कामगिरी करण्याऱ्या रहाणेला वगळून रोहित शर्माला खेळवण्यात आले. परंतु, रोहितची कामगिरी साधारण होती. अजिंक्य रहाणेला वगळण्यामागे त्याच्या श्रीलंकेविरुद्धची खराब कामगिरीचे कारण दिले गेले, त्या दौऱ्यात रोहितने 3 डावात 217 धावा केल्या होत्या .
या दौऱ्याच्या दुसऱ्या सामन्यातसुद्धा शानदार कामगिरी करत असलेल्या भुवनेश्वर कुमार ऐवजी इशांत शर्माला संधी देऊन कोहलीने सगळ्यांना चकित केले होते.
1) शिखर धवनला पुजारा ऐवजी संधी देने :-
कसोटी क्रिकेटची भिंत मानल्या जाणाऱ्या पुजाराला वगळून दुसऱ्या कुणाला संधी देणे, ही गोष्ट कसोटी जाणकारांच्यादृष्टीने अजिबात योग्य नाही. त्यामुळे जेव्हा 20218 साली विराटने पुजाराऐवजी शिखर धवनला खेळवले होते, तेव्हा त्याच्यावर टीका झाली होती. विराट कोहलीचा हा निर्णय नंतर त्याच्याच अंगलट आला होता, कारण ह्या सामन्यापूर्वी झालेल्या दोन सराव सामन्यात धवनला भोपळाही फोडता आलेला नव्हता, तरीही त्याला या सामन्यात संधी देण्यात आली आणि ह्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात चांगली सुरवात करुन आणि खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर बाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“विश्वचषकासाठी मी विराट कोहलीचा लकी चार्म”, भारतीय खेळाडूने संघात परतण्याचा व्यक्त केला मनोदय
“पंतमध्ये धोनीच्या नेतृत्वाची झलक दिसते”, माजी भारतीय खेळाडूची रिषभवर स्तुतीसुमने