---Advertisement---

“विश्वचषकासाठी मी विराट कोहलीचा लकी चार्म”, भारतीय खेळाडूने संघात परतण्याचा व्यक्त केला मनोदय

On: शनिवार, मे 29, 2021 1:12 AM
---Advertisement---

भारतीय संघ पुढील महिन्याच्या सुरुवातीला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होईल. सध्या भारतीय संघ इंग्लंडला जाण्यापूर्वी मुंबई येथे क्वारंटाईन आहे. दुसरीकडे, सध्या संघाबाहेर असलेला अन्य एक वेगवान गोलंदाज पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करतोय. भारतासाठी पुन्हा खेळून विश्वचषक जिंकण्याचा मनोदय या गोलंदाजाने बोलून दाखवला.

राष्ट्रीय संघात पुनरागमनाचे लक्ष
बऱ्याच काळापासून भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी धडपड करत असलेला पंजाबचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाविषयी आपली मते मांडली. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना तो म्हणाला, “भारतीय संघासोबत असताना माझी कामगिरी जशी झाली होती त्याबाबत मी खुश आहे. मात्र, माझे स्वप्न आहे की मी भारतासाठी पुन्हा खेळून विश्वचषक विजेत्या संघाचा भाग व्हावे. सध्या ज्या प्रकारे माझा खेळ होतोय आणि त्यात मी सुधारणा करतोय, यावरून मला वाटते की, मी या संघाचा हिस्सा असावा.”

मी विराटचा लकी चार्म
सिद्धार्थने एकोणीस वर्षाखालील संघातील आठवणी ताज्या करताना म्हटले, “ज्याप्रकारे २००८ मध्ये भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाला मी विजेतेपद मिळवून देण्यात भूमिका बजावलेली, त्याच प्रकारची भूमिका या संघासाठी बजवायला आवडेल. त्यावेळी, मला कर्णधार विराट कोहली होता आणि यावेळी मी संघात असेल तर, त्याच्यासाठी लकी चार्म ठरेल.”

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाने मलेशियामध्ये २००८ साली विश्‍वचषक जिंकला होता. अखेरच्या षटकात बचावासाठी १९ धावा असताना सिद्धार्थने केवळ ६ धावा देत संघाचा विजय पक्का केलेला.

भारताचे केले आहे प्रतिनिधीत्व
पंजाबसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सिद्धार्थने आत्तापर्यंत भारतीय संघासाठी ३ वनडे व ३ टी२० मध्ये चार बळी मिळविले आहेत. सिद्धार्थ आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आयपीएलमध्ये ४९ सामने खेळताना ५४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. कौल आपल्या स्लोवर वन चेंडूसाठी व धारदार बाउन्सरसाठी ओळखला जातो.

महत्त्वाच्या बातम्या – 

आतुरता टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची! न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात ‘या’ ५ भारतीयांवर असेल सर्वांचे लक्ष

“पंतमध्ये धोनीच्या नेतृत्वाची झलक दिसते”, माजी भारतीय खेळाडूची रिषभवर स्तुतीसुमने

‘या’ कारणामुळे इंग्लंडचे फलंदाज अक्षर पटेलविरुद्ध ठरले अपयशी, फिरकीपटूनेच केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---