फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिका खेळला. या तिन्ही मालिकेत भारताचे वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यातील पराभवानंतरही भारताने शानदार पुनरागमन करत मालिका जिंकली. या मालिका विजयात भारताचा डावखुरा गोलंदाज अक्षर पटेलनी मोलाचे योगदान दिले. त्याला त्याच्या कामगिरीचे फळ म्हणून पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
नुकतेच अक्षर पटेलनी म्हटले आहे की, इंग्लंडच्या फलंदाजांना त्याची गोलंदाजी लवकर समजत नाही. त्यामुळे ते स्विप किंवा रीवर्स स्विप खेळतात. पटेलनी मार्च महिन्यातील इंग्लंडविरुद्ध झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये 27 बळी घेतल्या होत्या.
पटेलनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले की, ‘जर इंग्लंड सोबत सामना झाला तर भलेही चेंडू स्विंग होवो किंवा न होवो ते स्विप किंवा रिवर्स स्विप खेळायला सुरुवात करतात. त्यांना माझी गोलंदाजी लवकर समजत नसून ते फक्त बघतात की चेंडूचा टप्पा कोठे पडतो.’
पटेलनी हे मान्य केले की, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन दोघे अष्टपैलू खेळाडू संघात असतील तर इतर खेळाडूंना संघात स्थान मिळणे कठीण आहे.
तो म्हणाला की, ‘मला नाही वाटत की माझ्यामध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता आहे. दुर्दैवाने मला दुखापत झाली आणि एक एकदिवसीय संघातून माझे स्थान गमावले. रवींद्र जडेजा आणि अश्विन या दोघांनीही कसोटी सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. जडेजा अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे डावखुरा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूला संघात जागा मिळून मिळणं खूपच कठीण आहे. मनगट फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. संघ संयोजनामुळे मी बाहेर पडलो. जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला’.
पटेल म्हणाला की, ‘मला नाही वाटत की मी सर्व परिस्थितीत खेळलो आहे. माझी गोलंदाजी दुसऱ्यांपेक्षा वेगळी आहे. हे सर्व माझ्या प्रदर्शनावर अवलंबून आहे. मी गतीसोबत गोलंदाजी करतो. जेव्हा मी अनिल कुंबळे आणि आर अश्विन या वरिष्ठ खेळाडूंना भेटतो तेव्हा मी त्यांना विचारतो की, कसा मी आणखी उत्कृष्ट कामगिरी करू शकतो.’
महत्त्वाच्या बातम्या –
‘रियुनियन हे लहान मुलांचे होते, दिग्गज कायम एकत्रच असतात’, भारतीय दिग्गजाची मजेशीर पोस्ट
पत्नीसाठी तेलुगू कॅप्शनसह वॉर्नरने केला कार्टून फोटो पोस्ट; कँडिसकडून मिळाला ‘असा’ रिप्लाय
दिग्गजाने ‘फ्रि हीट’ हटवण्याचे सुचवताच, आर अश्विनने केली ‘फ्रि बॉल’ची मागणी