भारतीय संघाकडून क्रिकेट खेळणे, हे भारतातील प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचे स्वप्न असते. मात्र, भारतीय संघाकडून खेळण्याआधी रणजी ट्रॉफी ही अशी स्पर्धा आहे ज्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला भारतीय क्रिकेट वर्तुळात एक वेगळी ओळख निर्माण होते. रणजी ट्रॉफी स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना भारतीय संघात संधी दिली जाते. साहजिकच त्यामुळे स्थानिय क्रिकेट मध्ये रणजी ट्रॉफीला एक वेगळं वलय निर्माण झाले आहे. अनेक भारतीय खेळाडूंचे स्वप्न असते की एकदा तरी रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकावी. मात्र, यात सर्वच खेळाडू यशस्वी होतात अस नाही. आपण या लेखामध्ये असे ४ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू पाहणार आहोत, जे आपल्या कारकिर्दीमध्ये एकदाही रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकू शकले नाहीत.
४. मोहम्मद अझरुद्दीन
भारताचे माजी दिग्गज क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी आतंरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी केलेली आहे. भारताकडून खेळताना त्यांनी ९९ कसोटी सामन्यात २२ शतके केलेली आहेत. मात्र, या दिग्गज खेळाडूला एकदाही रणजी ट्रॉफी स्पर्धेत जिंकता आलेली नाही. १९९१ ते २००० पर्यंत ते हैदराबाद संघाकडून खेळत होते. २००० सालीच मॅच फिक्सिंग मुळे त्यांची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
३. व्हीव्हीएस लक्ष्मण
व्हीव्हीएस लक्ष्मणची गणना भारताच्या सार्वकालीन महान क्रिकेटपटूंमध्ये होते. १९९६ साली आपल्या आतंरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर २०१२ पर्यंत तो भारताचा नियमित कसोटी खेळाडू होता. लक्ष्मणने १९९३ मध्ये हैदराबाद संघाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली व २०१२ पर्यंत तो संघात होता. या संपूर्ण रणजी ट्रॉफीच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये त्याने ५००० पेक्षा अधिक धावा व ३ द्विशतके देखील ठोकली आहेत. मात्र, विजेते पदाचा बहुमान मिळवण्यात तो अपयशी ठरला.
२. युवराज सिंग
‘सिक्सर किंग’ युवराज सिंग हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. २००७ टी२० व २०११ वनडे विश्वचषकांच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या युवराजला मात्र रणजी ट्रॉफी स्पर्धेत संघाला विजय मिळवून देता आला नाही. १९९७ साली पंजाब संघाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झालेल्या युवराजला अनेक वर्ष खेळूनही विजेते पदाने हुलकावणीच दिली.
१. एमएस धोनी
‘कॅप्टन कूल’ या नावाने क्रिकेट वर्तुळात ओळख असेल्या एमएस धोनीने आपल्या कारकीर्दीमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. भारताला टी२० व वनडे विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीला रणजी ट्रॉफी स्पर्धेत मात्र विजय मिळवता आला नाही. २००० साली रणजी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर काही वर्षातच धोनी भारतीय संघाचा नियमित कर्णधार बनला. आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरलेल्या या कर्णधाराला देखील रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकता आली नाही.
ट्रेंडिंग लेख-
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
महत्त्वाच्या बातम्या-
हे नाही पाहिलं तर काय पाहिलं! भक्कम बचाव असलेला पुजारा अफलातून चेंडूवर त्रिफळाचीत
धोनीच्या पत्नीने अस्वलाला चारले अन्न, तर सिंहाच्या छाव्याला पाजले दूध; Video तुफान व्हायरल