भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) यूट्यूबवर नवी सुरूवात केली आहे. आतापर्यंत तो इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये पॉडकास्ट होस्ट करताना दिसत होता, परंतु आता त्याने त्याच्या हिंदी भाषिक चाहत्यांसाठी ‘एश की बात’ नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. अल्पावधीतच त्याच्या ग्राहकांची संख्या हजारांवर पोहोचली आहे. पण युट्यूबवर पाऊल ठेवणारा अश्विन हा पहिला भारतीय क्रिकेटपटू नाही. या बातमीद्वारे आपण अशा क्रिकेटरविषयी जाणून घेऊया.
आकाश चोप्रा- आकाश चोप्राने (Aakash Chopra) आपल्या समालोचन शैलीने लोकप्रियता मिळवली आहे. स्थानिक क्रिकेटच्या व्हिडिओंवरही तो अनेकदा प्रतिक्रिया देताना दिसतो. तो 10 ऑगस्ट 2011 रोजी यूट्यूबवर जाॅईन झाला होता. त्याच्या चाहत्यांची संख्या इतर क्रिकेटपटूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या 46 लाखांहून अधिक आहे आणि त्याचे व्हिडिओ आतापर्यंत 125 कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत.
सचिन तेंडुलकर- नोव्हेंबर 2013 मध्ये शेवटचा सामना खेळून सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला होता. त्याने निवृत्तीच्या काही दिवस आधी 26 सप्टेंबर 2013 रोजी यूट्यूब चॅनल सुरू केले, ज्याच्या सदस्यांची संख्या 16 लाखांपेक्षा जास्त आहे.
रिषभ पंत- रिषभ पंत (Rishabh Pant) हे नाव या यादीत सर्वात नवीन जोडले गेले आहे कारण त्याने यावर्षी एक युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. तो युट्यूबवर फारसा सक्रिय नाही. तो दर 2-3 आठवड्यांनी एक व्हिडिओ अपलोड करतो. त्याच्या सदस्यांची संख्या सध्या 2.1 लाखांपेक्षा थोडी जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ दिवशी होणार नव्या एनसीएचे उद्घाटन? पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडू शकतो सोहळा
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे टाॅप-5 संघ
विराट-रोहित नाही, तर ‘हा’ दिग्गज आहे खरा सुपरस्टार! अश्विनचा मोठा खुलासा