भारतीय संघ नेहमीच दर्जेदार फिरकी गोलंदाजांसाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या इतिहासात फिरकी गोलंदाजांनी भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. वनडे सामन्यांतही मोक्याच्या क्षणी बळी मिळवून देण्याची जबाबदारी फिरकीपटूंच्या खांद्यावर असते.
टी-२० क्रिकेटच्या आगमनानंतर क्रिकेट अधिकच आक्रमक आणि वेगवान झाल्याने वनडे सामन्यांत धावांचे डोंगर उभारले जातात. त्यामुळे बळी मिळविण्याच्या प्रयत्नात कधीकधी फिरकी गोलंदाज महागडे देखील ठरतात. आज आपण अशाच ३ भारतीय फिरकी गोलंदाजांचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी एका वनडे सामन्यात सर्वाधिक धावा दिल्या आहेत.
४. कुलदीप यादव (८४ धावा)
भारताने ५ फेब्रुवारी २०२० रोजी न्यूझीलंडच्या हॅमिल्टन मैदानावर खेळविण्यात आलेल्या वनडे सामन्यांत प्रथम फलंदाजी करतांना ५० षटकांत ४ बाद ३४७ धावांचा डोंगर उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात भारताचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सर्वात महागडा ठरला. त्याने १० षटकांत २ बळी घेतले. मात्र, तब्बल ८४ धावा दिल्या. न्यूझीलंडने हा सामना ४ गडी राखून जिंकला.
३. पीयुष चावला (८५ धावा)
सन २००८ साली किटप्लाय कपच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होता. या सामन्यांत पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करतांना सलमान बट आणि युनूस खानच्या शतकांच्या बळावर ३ बाद ३१५ अशी धावसंख्या उभारली. भारतीय संघाकडून फिरकीपटू पीयुष चावलाने सर्वाधिक धावा दिल्या. १० षटकांत ८५ धावा देतांना तो एकही बळी मिळवू शकला नाही. पाकिस्तानी संघाने हा सामना २५ धावांनी जिंकला.
२. युझवेंद्र चहल (८८ धावा)
३० जून २०१९ रोजी भारत आणि इंग्लंड संघांमध्ये वनडे विश्वचषकाच्या साखळी फेरीचा सामना खेळविण्यात आला. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्सच्या दमदार खेळींच्या जोरावर ७ विकेट्स गमावत ३३७ धावा उभारल्या. या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर खोर्याने धावा काढल्या. चहलने १० षटकांत तब्बल ८८ धावा दिल्या. मात्र, एकही बळी तो पटकावू शकला नाही. हा सामना इंग्लंडने ३१ धावांनी जिंकला होता.
१. युझवेंद्र चहल (८९ धावा)
एका वनडे सामन्यांत सर्वाधिक धावा देणार्या भारतीय फिरकी गोलंदाजांच्या यादीत युझवेंद्र चहल अव्वल स्थानी आहे. २७ नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. भारतीय संघाविरुद्ध वनडे सामन्यांतील तिसर्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या उभारताना कांगारू फलंदाजांनी ६ बाद ३७४ असा डोंगर उभारला. या डावात फिरकीपटू चहल सर्वाधिक महागडा ठरला. त्याने एक बळी घेत १० षटकांत ८९ धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना ६६ धावांनी जिंकला.
ट्रेंडिंग लेख-
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठे तीन विजय
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल