पुणे। ४ लायन्स एफए आणि स्निग्मय एफसी ब संघांनी एकतर्फी विजयासह पीडीएफए फुटबॉल लीग स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.
सप महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ४ लायन्स एफए संघाने भारती एफसी संघाचा ५-० असा पराभव केला. एच गटातील या सामन्यात कुणाल येवले याने ४ आणि ३४व्या मिनिटाला गोल करून विजयात मोठा वाटा उचलला. मार्शिलीन याने २९ आणि ४९व्या मिनिटाला दोन, तर तन्मय पंथोड याने ५४व्या मिनिटाला एक गोल केला.
त्यानंतर झालेल्या ई गटातील सामन्यात स्निग्मय एफसी ब संगाने जुन्नर तालुका संघावर ३-० अशी एकतर्फी मात केली. मनु अल्फास याने सातव्या, तर विष्णू पिल्लेने १८व्या, सुदीप सुरेंद्र याने ४९व्या मिनिटाला गोल केले.
एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या महिला लीगमधील सामन्यात उत्कर्ष क्रीडा मंच ब संघाने केशव क्रीडा प्रतिष्ठान संघाचा५-० असा पराभव केला. शरण्या नंदी हिने १४ आणि २०व्या मिनिटाला दोन गोल केले. तेजस्विनी थापा हिनेही १६ आणि २५व्या मिनिटाला दोन गोल करून आपला वाटा उचलला. सारिशा अगरवाल हिने ३६व्या मिनिटाला एक गोल केला.
निकाल-
एसएसपीएमस मैदान- महिला लीग
गट अ – उत्कर्ष क्रीडा मंच ब ५ (शरण्या नंदी १४, २०वे, तेजस्विनी थापा १६, २५वे सारिशा अगरवाल ३६वे मिनिट) वि. वि. केशव माधव प्रतिष्ठान ०
गट ब – उत्कर्ष क्रीडा मंच अ २ (कल्याणी धुमाळ २७वे, रचेल मायकेल ५६वे मिनिट) वि.वि. बेटा स्पोर्टस क्लब ०
गट ब – बेकडिन्हो ३ (ऐश्वर्या जगताप ४२वे, ईशा पाचपुते ४८, ६०वे मिनिट) वि.वि. युपीएसए १ (धनश्री लांडगे १५वे मिनिट)
सप महाविद्यालय- तृतीय श्रेणी
गट इ – नॉईजी बॉईज (योगेश लाड ४५वे, दिनेश राठोड ५७ वे मिनिट) वि.वि. नाझ एफए ०
गट ई – स्निग्मय एफसी ब ३ (मनु अल्फास ७वे, विष्णू पिल्ले १८वे,. सुदीप सुरेंद्र ४९वे मिनिट) वि.वि. जुन्नर तालुका ०
गट एच – ४ लायन्स एफए ५ (कुणाल येवले ४थे, ३४वने, सी. मार्शिलीन २९, ४९वे मिनिट, तन्मय पंथोड ५४वे मिनिट) वि.वि. भारती एफसी ०
गट डी – इंद्रायणी एससी ब ० बरोबरी वि. इन्फॅंट्स ०
गट डी – पिंपरी चिंचवड १ (रेवन आसवले ३४वे मिनिट) बरोबरी वि. पूना सोशल स्पोर्टस क्लब १ (मनिष घाग ३६वे मिनिट)
गट सी – इनव्हे़र्स एससी ३ (आनंद कुमार २८वे, पृथ्वी ए ४३, गोपाळ कुसाळकर ५४वे मिनिट) वि.वि. केएमपी इलेव्हन १ (सकलैन शेख २२वे मिनिट)
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुरहारीने साकारला युपीएसएचा विजय; परशुरामियन्सचा विजयासाठी संघर्ष