डब्लिन | एमएस धोनी आज टी२० कारकिर्दीतील ९०वा सामना खेळत असून टीम इंडियाचा हा १००वा सामना आहे.
या सामन्यात भारताच्या या महान माजी कर्णधाराला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. धोनीने ८९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ४६ षटकार मारले आहेत.
या सामन्यात जर धोनीने ४ षटकार मारले तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ५० षटकार मारणारा तो जगातील २४वा खेळाडू ठरणार आहे.
भारताकडून यापुर्वी रोहित शर्मा (७८), सुरेश रैना(५४) आणि युवराज सिंग (७४) यांनी ५० षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ५६ सामन्यात १०३ षटकार मारले आहेत. त्याबरोबर ७५ सामन्यात १०३ षटकार ठोकत न्युझीलंडचा मार्टीन गप्टीलही अव्वल स्थानावर विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पुढील १३ दिवसांत ४ संघाना टी२०मध्ये नंबर १ होण्याची संधी
–Video- कोर्टवरील हस्तमैथुनाचे हावभाव पडले महागात, टेनिसपटूला १३ लाखांचा दंड
-वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात
-युजवेंद्र चहलने २०१९ विश्वचषकाबद्दल केले मोठे वक्तव्य
–…तर भारत-पाकिस्तान जागतिक क्रिकेटवर राज्य करु शकतात!
–रहाणेला वनडेत का संधी दिली नाही? मुंबईकर दिग्गजाचे निवड समितीवर ताशेरे
–सेहवाग म्हणतो, या खेळाडूला ११ खेळाडूंमध्ये स्थान देऊ नका