---Advertisement---

…तर भारत-पाकिस्तान जागतिक क्रिकेटवर राज्य करु शकतात!

On: बुधवार, जून 27, 2018 3:58 PM
---Advertisement---

पाकिस्तानचे माजी क्रिकेपटू जावेद मियादादने यांनी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संबंधी मोठे भाष्य केले आले आहे.

गेल्या दहा वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय कारणांमुळे द्विपक्षीय मालिका झालेली नाही.

याच मुद्द्यावर जावेद मियादाद यांनी पत्रकारांशी बोलताना विविध मते व्यक्त केली. “भारत आणि पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळलेले नाहीत. मात्र आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत ते एकमेकांविरोधात खेळतात.”

“भारत आणि पाकिस्तान जेवढे जास्त क्रिकेट एकमेकांविरोधात खेळतील तितक्या लवकर आपला एकमेकांविरोधातला तिरस्कार कमी होईल. याच बरोबर हे दोन्ही संघ जागतिक क्रिकेटवर राज्य करु शकतील.” मियादाद पुढे म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान गेल्या दहा वर्षांपासून एशिया कप आणि आयसीसीची स्पर्धा सोडून एकही द्विपक्षीय एकदिवसीय सामना खेळले नाहीत.

भारता विरोधात कायमच चांगली कामगिरी करणारे जावेद मियादाद पाकिस्तानचे महान फलंदाज होते.

त्यांनी 124 कसोटी सामन्यात 52.57 च्या सरासरीने 8832 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 द्विशतके, 23 शतके आणि 43 अर्धशतके केली आहेत.

तर 233 एकदिवसीय सामन्यात 41.47 च्या सरासरीने 7381 धावा केल्या आहेत. यामध्ये 8 शतके आणि 50 अर्धशकांचा समावेश आह

महत्त्वाच्या बातम्या-

-वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात

-युजवेंद्र चहलने २०१९ विश्वचषकाबद्दल केले मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment