कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणार्या खेळाडूंविषयी बोलताना इतर देशांच्या तुलनेत भारताचे नाव मागे आहे. इंग्लंडचे विल्फ्रेड रोड्स कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ खेळले. वयाची ५२ वर्ष आणि १८० दिवसांचे असताना कसोटीत ते खेळले. भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये जास्त काळ खेळणार्या खेळाडूंची संख्या कमी आहे. कसोटी क्रिकेट हा सर्वात कठीण खेळ मानला जातो.
सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. कालांतराने, अनुभव आणि इतर गोष्टी बदलल्याने आणि नंतर संघात खेळाडूंची संख्या देखील लक्षणीय वाढली.
एक वेळ असा होता की भारतीय संघाने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान मिळवले. हा कारनामा सांघिक कामगिरीमुळे शक्य झाला. बऱ्याचदा संघात युवा खेळाडूंना संधी दिली जाते. साधारण ३५ वर्षानंतर खेळाडू निवृत्तीचा विचार करण्यास सुरुवात करतात. पण असेही काही खेळाडू आहेत, जे वयाच्या चाळीसीनंतरही कसोटी क्रिकेट खेळत होते. या लेखातही कसोटी खेळणार्या ४ वयस्कर भारतीय खेळाडूंचा उल्लेख केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये जास्त वय असूनही खेळणारे ४ ज्येष्ठ भारतीय खेळाडू
४. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
या खेळाडूने जास्त वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. वयाच्या १६ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही सर्वात जास्त वय असताना कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीयांच्या यादीत स्थान मिळवले आहे. सचिन तेंडुलकरचे अखेरच्या सामन्यात वय ४० वर्ष आणि २०४ दिवसांचे होते. त्याने हा शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला आणि तो क्रिकेटमधून निवृत्त झाला. अंतिम कसोटी डावात त्याने ७४ धावा केल्या.
३. लाला अमरनाथ (Lala Amarnath)
लाला अमरनाथ हे भारताचे तिसरे वयाने सर्वात मोठे कसोटी खेळणारे खेळाडू आहेत. त्यांनी ४१ वर्षे आणि ९१ दिवस वय असताना शेवटचा कसोटी सामना खेळला. रुस्तमजी जमसेटजी यांनीही वयाच्या ४१ वर्ष आणि २७ दिवसांनी कसोटीमध्ये पदार्पण केले होते. पण लाला अमरनाथ हे ज्येष्ठ असल्याने आणि अधिक सामने खेळल्यामुळे या यादीत लाला अमरनाथ हे तिसर्या क्रमांकावर आहेत. अमरनाथ यांनी २४ कसोटी सामन्यांमध्ये ८ शतकांसह ८७८ धावा केल्या.
(टीपः रुस्तमजी जमसेटजी वयाच्या ४१ वर्ष आणि २७ दिवसांचे असताना फक्त एकच सामना खेळले आणि तो त्यांचा पदार्पणाचा सामना होता, त्यामुळे त्यांना या यादीत समाविष्ट केले नाही.)
२. सीके नायडू (CK Naidu)
सीके नायडू वयाची ४० वर्ष आणि २८९ दिवसांचे असताना भारतासाठी एक कसोटी सामना खेळले. या सामन्यात भारतीय संघाला ९ गडी राखून पराभव पत्करावा लागला. परंतु नायडू यांनी दुसर्या डावात शानदार ८१ धावा केल्या होत्या. सीके नायडू ६९ वर्षांच्या वयापर्यंत भारतासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले. ते तरुण होते, तेव्हा भारताला कसोटीचा दर्जा नव्हता, त्यामुळे सन १९३२ मध्ये निवृत्तीच्या जवळपास असताना कसोटीमध्ये त्यांनी पदार्पण केले.
१. विनू मंकड (Vinoo Mankad)
भारतीय क्रिकेटपटू विनू मंकड वयाच्या ४१ वर्षे ३०५ दिवसांपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये खेळले. मंकड यांनी १९५९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. १३ वर्ष ते भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळले. अंतिम सामन्यात विनू मंकड यांची कामगिरी काही खास नव्हती आणि त्यांनी पहिल्या डावात २१ धावा केल्या. दुसर्या डावात मंकड यांना खातेही उघडता आले नाही.