आयपीएलच्या आगामी हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आगामी आयपीएलपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलताना दिसणार आहेत. तत्पूर्वी आपण या बातमीद्वारे शेवटच्या आयपीएल हंगामात अनसोल्ड ठरलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. ज्या खेळाडूंवर आगामी मेगा लिलावात मोठी बोली लागू शकते.
सरफराज खान- या यादीत भारताचा स्टार फलंदाज सरफराज खान 2024च्या आयपीएलमध्ये 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीवर आला होता, परंतु त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. मात्र, आगामी आयपीएलच्या मेगा लिलावात त्याच्यावर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्टीव्ह स्मिथ- आयपीएल 2024 मध्ये न विकला गेलेला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथवर (Steve Smith) 2025च्या आयपीएल मेगा लिलावात पैशांचा वर्षाव होऊ शकतो. अशा आशा व्यक्त केल्या जात आहेत कारण त्याच्या नेतृत्वाखाली वॉशिंग्टन फ्रीडमला 2024 मेजर लीग टी-20 मध्ये चॅम्पियन बनवले होते. कर्णधारपदासह स्मिथने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली.
जोश इंग्लिस- ऑस्ट्रेलियाचा शानदार यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिसला (Josh Englis) आयपीएल 2024 मध्ये कोणीही खरेदी केले नाही. तो लिलावात आला होता त्यावेळी त्याची मूळ किंमत 2 कोटी होती. मात्र, त्यावेळी त्याच्यावर कोणीही बोली लावली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
गेल्या वेळी अनसोल्ड राहिले, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात या खेळाडूंवर होईल पैशांचा वर्षाव
रोहित शर्माने मुंबई इंडियन्स सोडावी का? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत ‘या’ स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती! इशानला होऊ शकतो फायदा