भारतीय क्रिकेटसाठी २०२१ चे संमिश्र राहिले आहे. या वर्षात भारताने काही ऐतिहासिक विजय मिळवले. तर दुसरीकडे त्यांना आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले. याव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट चाहत्यांना भारतीय खेळाडूंचे असे काही प्रसंगही पाहायला मिळाले, ज्यामध्ये विरोधी संघातील खेळाडूंनी भारतीय खेळाडूंची पायखेची करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय खेळाडूंनी या सर्वच प्रसंगांवेळी प्रतिस्पर्धांच्या सडेतोड प्रत्युत्तर देत, त्यांना तोंडघशी पाडले आहे. (4 Sleding Moments Of Year 2021) याच प्रसंगांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
जेव्हा टीम पेन (Tim Paine)ने अश्विन (R Ashwin)ला केली होती शिवीगाळ
या वर्षातील पहिला विवाद आहे भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टिम पेन यांचा. ही घटना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडली होती. भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. परंतु सामन्याच्या शेवटच्या दिवशी यष्टीरक्षक रिषभ पंतच्या विकेटसह वरच्या आणि मधल्या फळीतील जवळपास सर्व प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर हनुमा विहारी आणि आर अश्विन मैदानावर तग धरून सामना अनिर्णित करण्याच्या दृष्टीने विकेट वाचवून फलंदाजी करत होते.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या अवघड चेंडूंवरही ते आपली विकेट वाचवून खेळत होते. हे पाहून यष्टीमागे उभा असलेल्या टीम पेनने अश्विनचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. तो म्हणाला होता की, गाबामध्ये या, आम्ही तिथे तुम्हाला उत्तर देऊ. यावर अश्विन म्हणाला होता की, आमची काळजी करू नकोस. आम्ही तिथेही येऊ आणि तुम्हाला पराभूत करू. यावर टीम पेनने अश्विनलला शिवीगाळ केली होती. अखेर भारताने पुढील गाबा कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवत, टीम पेनला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.
जेव्हा बुमराह (Jasprit Bumrah) शी भिडला होता जेम्स अंडरसन (James Anderson)
२०२१ मधील दुसरा विवाद म्हणजे, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन यांचा. लॉर्ड येथे उभय संघांमध्ये झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान नेहमी मैदानावर शांत दिसलेला बुमराह अंडरसनसोबत बाचाबाची करताना कॅमेरात कैद झाला होता. हा प्रसंग सामन्याच्या तिसऱ्या दिवशी घडला होता, जेव्हा इंग्लंडकडून फलंदाजी करण्यासाठी जेम्स अंडरसन मैदानावर आला होता. यावेळी बुमराहने शॉर्ट चेंडू आणि बाउंसर्सचा मारा करत त्याचे स्वागत केले होते. यातील काही चेंडू अंडरसनच्या चेहऱ्याला आणि शरीराला लागले होते.
यानंतर सामना संपल्यावर बुमराहने त्याच्या बाउंसर गोलंदाजीसाठी अंडरसनला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यावर अंडरसनने नाराजी व्यक्त केली होती. तो या संभाषणादरम्यान बुमराहला म्हणाला होता की, तू मला बघून मुद्दाम वेगवान गोलंदाजी का करत होतास. मी येण्यापूर्वी तर तू ८० मिली दर ताशी च्या वेगाने गोलंदाजी करत होतास. पण मी आल्यानंतर तुझ्या गोलंदाजीचा वेग वाढवलास. हा अप्रामाणिकपणा आहे आणि मी यासाठी तुझी क्षमा अजिबात स्विकार करत नाही.
या प्रसंगानंतर दुसऱ्या डावात अंडरसनने सूड घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याने बुमराह फलंदाजीला आल्यानंतर मुद्दाम वेगवान बाउंसर्स टाकले हते. पण त्याचा हा डावपेच इंग्लंड संघावरच उलटला आणि बुमराहने मोहम्मद शमीसोबत मिळून भक्कम भागिरादीर रचत संघाला विजय मिळवून दिला होता.
हेही पाहा- https://youtu.be/PCM95L7GEBo
जेव्हा कोहली (Virat Kohli) शी भिडला होता जेम्स अंडरसन
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील लॉर्ड्स कसोटीत, इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अंडरसन भारताचा कर्णधार विराट कोहलीशीही भिडला होता. लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. यावेळी कोहली फलंदाजीला आला असताना त्याच्यात आणि अंडरसनमध्ये तिखट संवाद झाला होता.
कोहली नॉन स्ट्राईकर बाजूला उभा असताना अंडरसन रन अपसाठी येत होता. यावेळी तो काहीतरी बडबडत होता. हे पाहून कोहली त्याला म्हणाला होता की, तू परत शपथ घेतोय का जशी बुमराहपुढे घेत होतास. यावर अंडरसन कोहलीला म्हणाला होता की, तुझी इच्छा असेल तर तुही शप्पथ खाऊ शकतो. तुला इथे कोणीही अडवणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या नियमांनुसार खेळत असता. यावर कोहली त्याला म्हणाला होता की, आता तू मला पळण्यासाठीही …. करत आहेस. हे तुझ्या घरामागचे अंगण नाहीये. याला प्रत्युत्तर देताना अंडरसन म्हणाला होता की, मला वाटते की, गोलंदाजही खेळपट्टीवर धावू शकतात.
अखेर यावर कोहलीने असे काही उत्तर दिले होते की, अंडरसनची बोलती बंद झाली होती. कोहली म्हणाला होता की, बक-बक-बक.. तू फक्त हेच करू शकतो. जेव्हा माणून म्हातारा होऊ लागतो, तेव्हा तो फक्त हेच करत असतो.
जेव्हा मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) शी भिडला होता सॅम करन (Sam Curran)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली होती. भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या वाटेवर होता, इतक्यात पावसाने सामन्यात व्यत्यय आणला होता. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता. या सामन्यादरम्यान सिराज ७४ वे षटक टाकण्यासाठी आला असताना करनने चौकार मारत त्याला काहीतरी अपशब्द म्हटले होते. यावर सिराज रागाने त्याच्याकडे पाहात त्याच्या दिशेने जात होता. परंतु तो त्याला काहीही म्हणाला नाही.
नंतर सिराजने याबद्दल कर्णधार विराट कोहलीला सांगितले होते आणि पुढील चेंडू टाकताना वेगवान बाउंसर टाकला होता. या बाउंसर करन जखमी होता होता वाचला होता. नंतर सिराज पुन्हा करनच्या दिशेने चालत गेला होता. त्यांच्यातील हा वाद मिटवण्यासाठी कोहली आणि मैदानी पंचांना मध्यस्थी करावी लागली होती. सामन्यानंतर या प्रसंगाविषयी बोलताना सिराज म्हणाला होता की, करनने त्याला शिवीगाळ केल्याने त्याने असे केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अविस्मरणीय २०२१! यावर्षीचे क्रीडा क्षेत्रातील ५ खास क्षण, जेव्हा कोट्यवधी भारतीयांची उंचावली मान
व्हिडिओ: मुलाखतीत व्यस्त असलेल्या वुडसोबत स्टोक्सची मस्ती; चिडून गोलंदाज म्हणाला, ‘बंद कर ते’
…म्हणून भारतीय खेळाडूंनी पाळले मौन, तर साऊथ आफ्रिकन क्रिकेटर्सने दंडावर बांधली काळी पट्टी
हेही पाहा-