---Advertisement---

…म्हणून भारतीय खेळाडूंनी पाळले मौन, तर साऊथ आफ्रिकन क्रिकेटर्सने दंडावर बांधली काळी पट्टी

Team India
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला जोरदार प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला रविवारपासून (२६ डिसेंबर) प्रारंभ झाला आहे. हा सामना सेंच्यूरियनच्या मैदानावर सुरू आहे. दरम्यान हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी मौन पाळले होते. काय आहे यामागचे खरे कारण? चला जाणून घेऊया.

गेल्या कित्येक दिवसांपासून ही मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर ही मालिका सुरू झाली आहे. सेंच्युरियनच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंनी बिशप डेसमंड टुटू या वर्णभेद विरोधी नेत्याच्या सन्मानार्थ मौन पाळले होते, तर दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंनी दंडावर काळया रंगाची पट्टी बांधली होती.

भारतीय संघाच्या मीडिया युनिटने सांगितले की, दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ आणि एक राष्ट्र म्हणून दक्षिण आफ्रिकेने त्यांचे जगप्रसिद्ध राजकारणी, आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टुटू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले. दक्षिण आफ्रिकेचा संघ टुटूच्या सन्मानार्थ दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.

वर्णद्वेषाचे कट्टर विरोधक, टुटूने कृष्णवर्णीय लोकांवर अत्याचार करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील क्रूर शासनाचा अंत करण्यासाठी अहिंसकपणे अथक प्रयत्न केले. वांशिक न्याय आणि एलजीबीटीक्यू हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देखील देण्यात आला होता. (The reason why indian players kept silence before the start of first test)

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हेन 

भारत : केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), आर अश्विन,शार्दुल ठाकूर,मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, किगन पीटरसन, रासी वान दर डूसेन, टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), विआन मुल्डर, मार्को जेंसंन, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी.

महत्वाच्या बातम्या :

हर्षा भोगलेंनी निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’! ‘या’ तिघा भारतीयांची लागली वर्णी

गांगुली की धोनी? सर्वोत्तम कर्णधाराच्या प्रश्नावर भज्जी म्हणाला…

हे नक्की पाहा : विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain

विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain|क्रिकेटर कमी राजकारणी जास्त असलेला Vizi

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---