आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 18व्या हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. अलीकडेच 2025च्या आयपीएलसाठीचा मेगा लिलाव देखील पार पडला. यामध्ये सर्व फ्रँचायझींनी आपला संघ मजूबत करण्यासाठी तगड्या खेळाडूंची निवड केली. आता सर्वांच्या नजरा लीगच्या सुरूवातीवर आहेत. पण अनेक संघांनी अद्याप त्यांचे कर्णधार जाहीर केले नाहीत. आयपीएलच्या 10 पैकी 6 संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे. 4 संघांनी अद्याप आपले कर्णधार घोषित केले नाहीत.
मेगा लिलावात, फ्रँचायझींनी रिषभ पंत (Rishabh Pant), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) सारख्या भारतीय खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले. या खेळाडूंना 20 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली. लिलावाच्या वेळीच हे ज्ञात होते की यातील काही खेळाडू त्यांच्या संबंधित संघांचे कर्णधार बनू शकतात. दरम्यान श्रेयस अय्यरला कर्णधार बनवून पंजाब किंग्जने (Punjab Kings) हे खरे असल्याचे सिद्ध केले.
आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज (CSK), गुजरात टायटन्स (GT), मुंबई इंडियन्स (MI), राजस्थान रॉयल्स (RR), सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्जच्या (PBKS) कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे. चेन्नईने रूतुराज गायकवाडला, गुजरातने शुबमन गिलला, मुंबईने हार्दिक पांड्याला, राजस्थानने संजू सॅमसनला आणि हैदराबादने पॅट कमिन्सला कर्णधारपदी कायम ठेवले आहे. त्याच वेळी, पंजाबने मेगा लिलावात श्रेयस अय्यरला खरेदी केल्यानंतर त्याला कर्णधारपद दिले आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपरजायंट्स (LSG) अजूनही कर्णधाराच्या शोधात आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज – रूतुराज गायकवाड
दिल्ली कॅपिटल्स – कर्णधार जाहीर नाही
गुजरात टायटन्स – शुबमन गिल
कोलकाता नाईट रायडर्स – कर्णधार जाहीर नाही
लखनऊ सुपर जायंट्स – कर्णधार जाहीर नाही
मुंबई इंडियन्स – हार्दिक पांड्या
पंजाब किंग्ज – श्रेयस अय्यर
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – कर्णधार जाहीर नाही
सनरायझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
महत्त्वाच्या बातम्या-
“त्यांचे भविष्य त्यांना स्वतः ठरवू द्या” रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत महान क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
आयपीएल मेगा लिलावानंतर पाकिस्तान सुपर लीगमध्ये अनसोल्ड ठरला ‘हा’ स्टार खेळाडू
दिल्ली विमानतळावर भारतीय खेळाडूसोबत गैतवर्तन, फ्लाईटही चुकली; इंस्टा स्टोरी द्वारे संताप व्यक्त