कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज खूप संयमाने खेळतात. कारण या स्वरुपात फलंदाजांकडे खेळपट्टीवर स्थिर व्हायला वेळ असतो. म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळते. परंतु बऱ्याचदा कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजीही झाली आणि एकाच दिवसात पाचशेपेक्षा जास्त धावसंख्या देखील उभी राहिली. 500 धावा करायला सर्वसाधारणपणे दोन दिवस लागतात, पण एकाच दिवसात 500 धावा होणे दुर्मिळ. येथे आपण अशाच सामन्यांबाबत जाणून घेणार आहोत, ज्यात ही दुर्मिळ कामगिरी केली गेली.
4. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 508 धावा
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ऑगस्ट 1935 ला कसोटी सामना झाला होता. या सामन्यात तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांच्या मिळून एकूण 508 धावा झाल्या होत्या आणि आठ विकेट पडल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने आधी खेळत 476 धावा केल्या होत्या आणि दुसर्या डावात 287 धावा करत डाव घोषित केला होता. इंग्लंडला दुसरा डाव खेळण्याची संधी मिळाली नाही आणि हा सामना अनिर्णीत राहिला होता.
3. श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश, 509 धावा
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात जुलै 2002 मध्ये कोलंबो येथे कसोटी सामना झाला होता. यात सामन्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 502 धावा झाल्या होत्या. बांगलादेशने आधी फलंदाजी करत 161 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने पहिल्या डावात 541 धावांचा डोंगर उभा केला आणि डाव घोषित केला होता. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ 184 धावा करू शकला. या सामन्यात बांगलादेशला एक डाव आणि 196 धावांनी मोठी हार पत्करावी लागली होती.
2. इंग्लंड विरुद्ध साउथ आफ्रिका, 522 धावा
या यादीत दुसऱ्या स्थानावर इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला सामना आहे. जून 1924 मध्ये हा सामना खेळला गेला होता. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 522 धावा केल्या होत्या. आधी फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने 273 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात फक्त दोन विकेट गमावत 531 धावा केल्या आणि डाव घोषित केला होता. यात तीन फलंदाजांनी शतक लगावले होते. दुसऱ्या डावात आफ्रिकेने 240 धावा केल्याने त्यांना एका डावाने आणि १८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.
1. इंग्लंड विरुद्ध भारत, 588 धावा
भारत आणि इंग्लंड यांच्यात 25 जुलै 1936 ला मॅंचेस्टर येथे कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी 588 धावा झाल्या होत्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्यावेळी एकाच दिवशी एवढ्या धावा झाल्या नव्हत्या. भारताने पहिल्या डावात 203 तर दुसऱ्या डावात 390 धावा केल्या होत्या. इंग्लंडने 571 धावा करत डाव घोषित केला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हसरंगाची ‘लॉटरी’! आयपीएलचे ‘हे’ ३ संघ देऊ शकतात संधी
टी२० विश्वचषकासाठी झहीर खानने निवडला १५ सदस्यीय भारतीय संघ, बघा कोण इन कोण आऊट
अजिंक्य रहाणेचे खराब प्रदर्शन ‘या’ २ फलंदाजांसाठी खुले करू शकते कसोटी संघाचे दरवाजे






