इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 16 जूनला साखळी फेरीतील सामना रंगणार आहे.
मात्र 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा सामना भारताने खेळू अशी मागणी मोठ्याप्रमाणात होत आहे. या हल्ल्यात भारताचे 44 जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान जखमी झाले आहेत.
असे असतानाच दुसरीकडे 25 हजार प्रेक्षक क्षमता असणाऱ्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडीयमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी तब्बल 4 लाख अर्ज आले आहेत. याबद्दल आयसीसी विश्वचषकाचे संचालक स्टिव्ह एलवर्थी यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमात सांगितले आहे की या सामन्याच्या तिकीटांची मागणी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आणि कदाचीत अंतिम सामन्यापेक्षाही अधिक आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार एलवर्थी म्हणाले, ‘भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटांसाठी आमच्याकडे 4 लाखांपेक्षाही अधिक अर्ज आले आहेत. हा खूप मोठा आकडा आहे. पण ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडीयमची 25 हजारांचीच प्रेक्षक संख्येची क्षमता आहे. त्यामुळे अनेक लोकांची निराशा होणार आहे. तसेच जगभरातील प्रेक्षक आहेत.’
तसेच ते पुढे म्हणाले, ‘इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी 2,30,000-2,40,000 इतके तर अंतिम सामन्यासाठी 2,60,000-2,70,000 इतके तिकीटांसाठी अर्ज आले आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान हा मोठा सामना आहे. ते अंतिम सामनाही एकमेकांविरुद्ध खेळू शकतात, याबद्दल काही सांगता येत नाही.’
2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले होते. तसेच मागील वर्षी आशिया चषकात हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–सिक्सर किंग ख्रिस गेलने केले विश्वविक्रम, रोहित, आफ्रिदी यांनीही टाकले मागे
–मुंबईकर श्रेयस अय्यरचा टी२०मध्ये कहर कारनामा
–हार्दिक पंड्या टी२० आणि वनडे मालिकेतून बाहेर, वाचा काय आहे कारण