भारतीय महिला क्रिकेट संघ (india womens cricket team) आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट (New zealand womens cricket team) संघ या दोन संघामध्ये ५ सामन्याची एकदिवसीय मालिका सध्या सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना भारतीय संघाने शनिवारी (१२ फेब्रुवारी) ६२ धवांनी गमावला. न्यूझीलंडने भारताला २७६ धावांचे लक्ष्य दिले होते. याचा पाठलाग करताना भारतीय संघ ४९.४ षटकांत २१३ धावांवरच सर्वबाद झाला. या सामन्यानंतर एमिला केर आणि जेस केर (jess kerr) या दोन बहिणींनी न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत राहिल्या.
सुरुवातीला भारतीय कर्णधार मिताली राज हिने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून पहिल्यांदा फलंदाजी करत सलामीवीर सुझी बेट्सने १०६ चेंडूत १११ धावा केल्या. सुझी बेट्स आणि मॅडी ग्रीन या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ५४ धावा केल्या. ग्रीन १७ धावा करून बाद झाली. बेट्सने प्रथम एमिला केरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५२ आणि त्यानंतर एमी सॅटरथवेटसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. एमी सॅटरथवेटने ६३ धावा केल्या.
यादरम्यान एमीने आपले अर्धशतक पूर्ण केले. बेट्सने तिच्या कारकर्दीतील ११वे शतक पूर्ण केले. बेट्सच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडने ५० षटकांत २७५ धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा या चार गोलंदाजांनी २-२ बळी घेतले.
२७५ धवांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार मिताली राजने सर्वाधिक ५९ धावा केल्या. तिच्याशिवाय यास्तिका भाटियाने ४१ धावा केल्या. भारतीय संघातील या दोन खेळाडू सोडल्या तर कोणीच खास कामगिरी करू शकले नाही. जेसने ९.४ षटकात ३५ धावा देत ४ बळी घेतले. तर एमिलाच्या खात्यात एक विकेट आली. भारतीय संघ ५० व्या षटकात २१३ धावांवर सर्वबाद झाला आणि ६२ धावांनी सामना पराभूत झाला.
भारतीय संघाचा न्युझीलंड दौऱ्याची सुरुवात खराब झाली. पहिलाच एकदिवसीय सामना भारतीय महिला क्रिकेट संघाने गमावला आहे. यापूर्वी झालेला एकच टी२० सामना सुद्धा भारतीय संघ १८ धावांनी पराभूत झाला होता. आता दुसरा एकदिवसीय सामना १५ फेब्रुवारीला क्वीन्सटाऊन येथे खेळवला जाणार आहे. मार्चमध्ये न्यूझीलंडमध्येच महिला विश्वचषक खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंड्याची उणीव भरून काढण्यासाठी मुंबईने खेळला ‘या’ खेळाडूवर ८ कोटीचा दाव
IPL Auction: इंग्लडचा ‘हा’ गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात दाखल; १.५० कोटींची लागली बोली
डेवन कॉन्वेचा चेन्नईमध्ये प्रवेश !! तब्बल इतक्या कोटींची लागली बोली