---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक : हाॅकीमध्येही भारताची शानदार कामगिरी, न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव

Team India (3)
---Advertisement---

भारतीय हॉकी संघानं चमकदार कामगिरी करत पहिला सामना जिंकला. टीम इंडियानं या रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. भारताकडून मनदीप सिंग (Mandeep Singh), विवेक सागर (Vivek Sagar) आणि हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) यांनी गोल केले. हरमनप्रीतने 59व्या मिनिटाला टीम इंडियासाठी विजयी गोल केला.

पहिल्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने 0-1 अशी आघाडी घेतली होती. यानंतर टीम इंडियानं दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करत 1-1 अशी बरोबरी केली. टीम इंडियानं तिसऱ्या क्वार्टरमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने पुनरागमन केले आणि सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. शेवटी हरमनप्रीतनं विजयी गोल करत भारताला विजय मिळवून दिला.

 

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs SL पहिला सामना जिंकून भारताची विजयी सलामी, सूर्यकुमारचं झंझावाती अर्धशतक
पॅरिस ऑलिम्पिक : चिराग-सात्विकनं पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय
IND vs SL; पहिल्याच सामन्यात सूर्या चमकला, ठोकले झंझावाती अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---