सेन्चुरियन । भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत २-० असा पराभूत होऊनही रोहित शर्माच्या नावावर दोन खास विक्रम जमा झाले आहेत. रोहितला संघात स्थान दिल्यामुळे या मालिकेत खूप मोठी चर्चा झाली होती.
आज रोहितने ४७ धावांची खेळी केली. हे करताना भारताच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू बनला.
भारतीय संघातील सर्व फलंदाजांना या मालिकेत ४वेळा फलंदाजी करायला मिळाली. यात ४ पैकी ४ डावात दुहेरी धावा करणारा रोहित हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. ११,१०,१० आणि ४७ अशा त्याने या मालिकेत धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून केवळ एबी डिव्हिलिअर्सला अशी कामगिरी करता आली आहे.
आज रोहितने केलेल्या ४७धावा या त्याच्या कसोटीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सर्वोत्तम धावा आहेत.
४७ धावा या रोहितच्या चौथ्या डावातील वैयक्तिक सर्वोत्तम धावा आहेत. यापूर्वी २०१५ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये ३९ धावा केल्या होत्या.