पुणे। चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या सामन्यांना युकी भांब्री आणि प्रजनेश गुन्नेश्वरण या भारतीय खेळाडूंच्या आव्हानापासून सुरुवात होणार आहे. पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस संकुलात ही स्पर्धा पार पडणार आहे.
दिल्ली येथे जन्मलेल्या युकीला मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश देण्यात आला असून सलामीच्या लढतीत त्याचा सामना स्लोव्हाकीच्या जोझेफ कोवालीकशी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या प्रजनेशला वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला असून त्याचा सामना पाचव्या मानांकित डॅनियल अल्तामेयरशी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धेच्या चौथ्या मालिकेत देशांतील अव्वल मानांकित खेळाडू रामकुमार रामनाथन आणि अर्जुन कढे मुख्य ड्रॉच्या एकेरीपासून सुरुवात करणार आहेत. जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या ऍस्लन कारास्तेवसारख्या कडव्या प्रतिस्पर्धीचे आव्हान असणार आहे.
गतमालिकेत उपांत्य फेरीत प्रवेशकेलेल्या लुथीनियाच्या रिकार्ड्स बेरंकिस या मानांकित खेळाडूचा खेळ पाहायला मिळणार आहे. बेरंकिसचा सामना फ्रांसच्या हायल्स क्विंटिन यांच्याशी होणार आहे.
मुख्य ड्रॉमध्ये दुहेरीत ऑस्ट्रेलियाची अव्वल मानांकित जोडी लूक सॅव्हील व जॉन पॅट्रिक या जोडीचा सामना स्टेफनो ट्रॅव्हलग्लिया व बर्नरबी झपाटा मीरालस यांच्याशी होणार आहे.
पात्रता फेरीच्या लढतीत भारताच्या शशीकुमार मुकुंदला टर्कीच्या सेलीब्लिक आलटुगकडून 3-6, 3-6 असा तर, मनीष सुरेशकुमारला चेक प्रजासत्ताकच्या कोप्रिव्हा व्हीतकडून 2-6, 3-6 असा पराभव पत्करावा लागला.
याशिवाय अलेक्झांडर मुल्लेर, एलियास येमेर, जे क्लार्क, जियान मार्को मोरोनी, मार्क पोलमन्स आणि किम्मर कोपेजन्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन ओपन नावे करत नदाल बनला टेनिसविश्वाचा राजा! जिंकले विश्वविक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम
कोरोना नियमांचे पालन करून टेनिस स्पर्धेचे आयोजन- अजितदादा पवार





