वनडे क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहे जे अतिशय कमी वयात संघाचे कर्णधार झाले होते. अगदी उदाहरणचं द्यायचं म्हटलं तर अफगाणिस्तानचा राशिद खान १९ वर्ष व १६५ दिवसांचा असताना अफगाणिस्तानचा कर्णधार झाला होता.
तोच जगातील आजपर्यंतचा सर्वात युवा वनडे कर्णधार राहिला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर वयाच्या २३ वर्ष व १२६ दिवसांचा असताना भारतीय संघाचा कर्णधार झाला होता.
असे असले तरी काही खेळाडू असेही आहेत जे चाळीशीनंतरही संघाचे कर्णधार राहिले आहेत.
नाॅर्मन जिफाॅर्ड हा इंग्लंडचा माजी कर्णधार इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये शारजाह येथे २६ मार्च १९८५ रोजी झालेल्या सामन्यात वयाच्या ४४ वर्ष ३६१ दिवसांचा असताना संघाचे नेतृत्त्व करत होता. तोच आजपर्यंतचा जगातील सर्वात वयस्कर वनडे कर्णधार राहिला आहे.
भारताकडून असा कारनामा एमएस धोनीने केला आहे. धोनीने भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यादरम्यान २५ सप्टेंबर २०१८ रोजी दुबई येथे वयाच्या ३७ वर्ष व ८० दिवसांचे असताना टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळले होते. तोच भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर वनडे कर्णधार ठरला आहे. असे असले तरी वयस्कर कर्णधारांच्या यादीत धोनी जगात ३३वा आहे.
मोहम्मद अझरुद्दीननेही भारताकडून ३६ वर्ष व १२४ दिवसांचे असताना कर्णधारपद सांभाळले होते.
भारताचे आजपर्यंतचे सर्वात वयस्कर वनडे कर्णधार(3 all-time oldest Indian captains in ODIs)
३७ वर्ष व ८० दिवस- एमएस धोनी, भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई, २५ सप्टेंबर २०१८
३६ वर्ष व १२४ दिवस- मोहम्मद अझरुद्दीन, भारत विरुद्ध न्यूझीलंड, नाॅटिंग्घम, १२ जुन १९९९
३५ वर्षे व २४३ दिवस- सुनिल गावसकर, भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न, १० मार्च १९८५
जगातील सर्वात वयस्कर वनडे कर्णधार (5 all-time oldest captains in ODIs)
४४ वर्ष, ३६१ दिवस- नाॅर्मन जिफाॅर्ड, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, शारजाह, २६ मार्च १९८५
४३ वर्ष, ३०८ दिवस- राहुल शर्मा, हाॅंगकाॅंग विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, १८ जुलै २००४
४३ वर्ष, १६४ दिवस- खुर्रम खान, युएई विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई, २ डिसेंबर २०१४
४३ वर्ष, ६० दिवस- मोहम्मद तारिक, युएई विरुद्ध वेस्ट इंडिज, नेपियर, १५ मार्च २०१५
४२ वर्ष, ३४७ दिवस- स्टिवन ल्युबर्स, नेदरलॅंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी, ५ मार्च १९९६
अन्य वाचनीय लेख-
– तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना
– सचिन नाही तर हे आहेत लाॅर्ड्सवर शतक करणारे ५ मराठमोळे मुंबईकर क्रिकेटपटू
–सचिनच्या नावावर जरी धावा असल्या तरी हटके विक्रम आहेत कूकच्याच नावावर