---Advertisement---

सचिनला जमले नाही, परंतु ‘या’ ५ मुंबईकरांनी भरुन काढली लाॅर्ड्सवर शतकाची हौस

---Advertisement---

क्रिकेटची पंढरी म्हणून लाॅर्ड्स क्रिकेट स्टेडियमकडे पाहिले जाते. लंडनमध्ये दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे परंतु लाॅर्ड्सचे महत्त्व काही विशेषच.

लाॅर्ड्सवर शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंचे तसेच डावात ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचे नाव तेथे असणाऱ्या बोर्डवर लावले जाते. (lord’s honours board list.)

अनेक क्रिकेटपटूंचे येथे शतकी खेळी करत किंवा ५ विकेट्स घेत बोर्डवर नाव लावण्याची इच्छा असते.

भारताच्या सुनिल गावसकर, सचिन तेंडूलकर, कपिल देव, अजित वाडेकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, एमएस धोनी किंवा विरेंद्र सेहवाग सारख्या दिग्गज खेळाडूंना येथे क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतकी खेळी करता आली नाही.

क्लाईव्ह लाॅईड, ब्रेंडन मॅक्क्युलम किंवा ख्रिस गेलसारख्या खेळाडूंनाही येथे क्रिकेटच्या कोणत्याच प्रकारात शतक करता आले नाही.

भारताकडूनही येथे ज्या ९ खेळाडूंनी मिळून ११ शतके केली आहेत ती फक्त कसोटीत केली आहे. कोणत्याही भारतीय खेळाडूला येथे वनडेत किंवा टी२०मध्ये शतकी खेळी करता आलेली नाही.

भारताकडून लाॅर्ड्सवर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने राहुल द्रविड (९) खेळला आहे. त्यापाठोपाठ सचिन तेंडूलकर, झहिर खान व एमएस धोनी प्रत्येकी ८ तर सुनिल गावसकर व सौरव गांगुली प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत.

असे असले तरी ४ कसोटी सामने खेळलेल्या दिलीप वेंगसरकरांनी येथे ३ शतकी खेळी केल्या आहेत. इंग्लंडचे खेळाडू सोडून येथे कोणत्याही परदेशी खेळाडूला वेंगसरकरांशिवाय तीन शतके करता आलेली नाहीत.

सौरव गांगुलीने येथे कसोटी पदार्पणातच शतकी खेळी केली होती. या स्टेडियमवर तब्बल २१६ खेळाडूंनी कसोटीत पदार्पण केले. परंतु पदार्पणातच शतकी खेळी करणारे केवळ ५ खेळाडू असून गांगुली हा अशी कामगिरी करणारा तेव्हा दुसरा परदेशी खेळाडू ठरला होता. याच सामन्यात सौरवबरोबर पदार्पण केलेला द्रविड मात्र ९५ धावांवर बाद झाला परंतु त्याने पुढे याच मैदानावर शतकी खेळी केलीच.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताकडून ज्यांनी येथे शतक केले आहे त्यात अजित आगरकर व रवी शास्त्री या नावांचाही समावेश आहे.

भारताकडून ज्या खेळाडूंनी येथे ९ शतके केली आहेत त्यातील दिलीप वेंगसरकर, अजित आगरकर, विनू मंकड, अजिंक्य रहाणे व रवी शास्त्री हे मुंबईकडून रणजी सामने खेळले आहेत.

भारताकडून लाॅर्ड्सवर शतकी खेळी करणारे खेळाडू

३ शतके- दिलीप वेंगसरकर, ४ कसोटी, ८ डाव

१ शतकं- अजित आगरकर, १ कसोटी, २ डाव

१ शतकं- मोहम्मद अझरुद्दीन, ३ कसोटी, ५ डाव

१ शतकं- राहुल द्रविड, ४ कसोटी, ७ डाव

१ शतकं- सौरव गांगुली, ३ कसोटी, ५ डाव

१ शतकं- विनू मंकड, २ कसोटी, ४ डाव

१ शतकं- अजिंक्य रहाणे, २ कसोटी, ४ डाव

१ शतकं- रवी शास्त्री, ३ कसोटी, ६ डाव

१ शतकं- गुंडप्पा विश्वनाथ, ४ कसोटी, ८ डाव

सर्वाधिक हिट्स मिळालेले लेख

हे ५ खेळाडू संघात असले म्हणजे सामना टाय व्हायचे चान्सेस वाढलेच समजा

विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायला पैसे नव्हते म्हणून लतादीदींनी गायलं होतं गाणं

१९८३ व २०११ क्रिकेटविश्वचषकाच्या बक्षीसाच्या रकमा आहेत विचार करायला लावणाऱ्या

क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?

 असा आहे विश्वचषकात विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या ट्राॅफीचा इतिहास

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---