टी२० क्रिकेट हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे सर्वात वेगवान स्वरुप आहे. क्रिकेटच्या या स्वरुपात फक्त २० षटके खेळली जातात. त्यामुळे सहसा तर फलंदाज टी२० क्रिकेटमध्ये कमी चेंडूत फटकेबाजी करत अधिक धावा घेण्याचा प्रयत्न करतात. खूप कमी वेळेला असे पाहायला मिळते की एखाद्या फलंदाजाने टी२० क्रिकेटमध्ये ७०पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला आहे.
आजपर्यंत जगातील कोणताही फलंदाज आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ७६पेक्षा जास्त चेंडूवर खेळू शकला नाही. टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करणाऱ्या फलंदाजाने ७६ चेंडू खेळले आहेत. त्याच्यानंतर या यादीत अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
भारताचा हिटमॅन रोहित शर्मा हा भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने २०१५ला दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात ६६ चेंडूत १०६ धावा केल्या होत्या.
तर, जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करणाऱ्या पहिल्या ५ क्रिकेटपूंविषयी. 5 batsman who faced most balls in t20i innings.
ऍरॉन फिंच (७६ चेंडूत झिम्बाब्वेविरुद्ध, २०१८) –
जुलै २०१८मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने शतकी खेळी केली होती. यावेळी त्याने ७६ चेंडूत १६ चौकार आणि १० षटकार मारत १७२ धावांची दमदार खेळी केली होती. यासह त्याने टी२०त एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम नोंदवला. शिवाय, तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा जगातील अव्वल क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. हादेखील एक विश्वविक्रम आहे. अद्यापही त्याचा हा विश्वविक्रम कुणाला मोडता आलेला नाही.
शेन वॉटसन (७१ चेंडूत भारताविरुद्ध, २०१६) –
जानेवारी २०१६ला भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉटसनने नाबाद शतकी खेळी केली होती. यावेळी त्याने सिडनी येथील टी२० सामन्यात ७१ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १२४ धावा केल्या होत्या. त्यावेळी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विश्वविक्रम वॉटसनच्या नावावर होता. पण, २ वर्षांनी त्याचाच संघसहकारी ऍरॉन फिंचने हा विक्रम मोडत आपल्या नावावर केला.
मोर्ने वॅन विक (७० चेंडूत वेस्टइंडिविरुद्ध, २०१५) –
दक्षिण आफ्रिका संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोर्ने वॅन विक याने वेस्ट इंडिजविरुद्ध जानेवारी २०१५ला नाबाद शतकी खेळी केली होती. यावेळी त्याने ७० चेंडूत नाबाद ११४ धावा केल्या होत्या. यात त्याच्या९ चौकारांचा आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्यावेळी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केला होता.
मार्टिन गप्टिल (६९ चेंडूत दक्षिण आफ्रिकाविरुद्ध, २०१२) –
डिसेंबर २०१२मध्ये न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दमदार खेळी करत मालिकावीर पुरस्कार मिळवला होता. यावेळी त्याने पुर्व लंडनमधील दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी२० सामन्यात ६९ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ९ चौकारांचा आणि ६ षटकारांचा समावेश होता. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. हा विक्रम पुढे ३ वर्षे त्याच्या नावावर होता.
कलीम शाह (६९ चेंडूत मलावीविरुद्ध, २०१९) –
२०१९ला मोजांबिक आणि मलावी संघादरम्यान लिलोंग्वे येथे ७ सामन्यांची टी२० मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील चौथ्या सामन्यात कर्णधार कलीम शाहने ६९ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५ चौकारांचा आणि ३ षटकारांचा समावेश होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
करार न केलेल्या खेळाडूंना परदेशी लीग खेळता यावीत म्हणून रैना-इरफानने सुचवले उपाय
रोहित- रैना तयार केली सीएसके- मुंबईची मिळून जबरदस्त ड्रीम ११
अव्वल स्थानावर तर टीम इंडिया हवी होती; ऑस्ट्रेलिया कशी, महान…