भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे-नाईट क्रिकेट सामना असणार आहे. २४ फेब्रुवारीपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी मायदेशात बांगलादेश संघाविरुद्ध डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ऍडलेडमध्ये झाला होता. तसेच आता तिसऱ्यांदा भारतीय संघ डे-नाईट क्रिकेट सामना इंग्लंड संघाविरुद्ध खेळणार आहे.
या सामन्याआधी देखील मोटेरा स्टेडिमयवर बरेच सामने खेळले गेले होते. त्यावेळी काही धाकड फलंदाजांनी या मैदानावर दमदार कामगिरी केली होती. यात ५ असे फलंदाज होते, ज्यांनी या मैदानावर कसोटी सामना खेळताना दुहेरी शतक झळकावले आहे. त्याच फलंदाजांचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
मोटेरा स्टेडियमवर द्विशतक करणारे पाच फलंदाज-
१) सचिन तेंडुलकर: भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी या मैदानावर २९ चौकार मारत २१७ धावांची खेळी केली होती. हा कारनामा सचिन तेंडुलकर यांनी न्यूझीलंड संघाविरुद्ध १९९९ मध्ये केला होता. याच सामन्यात सौरव गांगुली आणि सदगोपण यांनी देखील शतक झळकावले होते.
२) राहुल द्रविड: भारतीय संघाची भिंत मानल्या जाणाऱ्या राहुल द्रविड यांनी २००३-०४ मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिल्या डावात २२२ धावांची खेळी केली होती. १ षटकार आणि २८ चौकार मारत त्यांनी ही धावसंख्या केली होती. तसेच सौरव गांगुली यांनी देखील या सामन्यात शतकीय खेळी केली होती. हा सामना ड्रॉ राहिला होता.
३) एबी डिवीलियर्स: मॉडर्न क्रिकेटमध्ये ‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिवीलियर्स याने २००७-०८ मध्ये भारतीय संघाविरुद्ध खेळताना अहमदाबादमध्ये नाबाद २१७ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि १७ चौकार मारले होते.
४) माहेला जयवर्धने: श्रीलंकन संघाचा दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धने यांनी २००९-१० मध्ये भारतीय दौऱ्यावर असताना, या मैदानावर २७५ धावांची खेळी केली होती. तसेच या सामन्यात तिलकरत्ने दिलशान आणि प्रसन्ना जयवर्धने यांनीदेखील शतक झळकावले होते.
५) चेतश्वर पुजारा: मॉडर्न क्रिकेटमध्ये भारतीय संघाची भिंत समजल्या जाणाऱ्या चेतश्वर पुजाराने २०१२ रोजी इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना २०६ धावांची खेळी केली होती. याव्यतिरिक्त विरेंद्र सेहवागने देखील या सामन्यात शतक झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १४.२५ कोटींचा धनी ठरलेल्या ‘मॅक्स’भाऊचा फ्लॉप शो, नेटकऱ्यांनी विराटच्या आरसीबीला केलं ट्रोल
‘केरळ एक्सप्रेस’ सुसाट! लिलावात दुर्लक्ष केल्यानंतर श्रीसंतचा बळींचा पंचक, फ्रँचायझींना सणसणीत चपराक
‘तेव्हा’ इशांत पहिल्यांदा ढसाढसा रडला होता; पत्नी प्रतिमाने सांगितला किस्सा