सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील असे नाव आहे की त्याचा वेगळा असा परिचय देण्याची गरज नाही कारण सचिन तेंडुलकरला क्रिकेटमध्ये “क्रिकेटचा देव” या नावाने ओळखले जाते. २४ वर्षे क्रिकेट खेळणार्या सचिन तेंडुलकरने आपल्या फलंदाजी दरम्यान अनेक विक्रम केले. त्याच्याकडून नोंदविलेले विक्रम हे इतर फलंदाजांना खूप कठीण असल्याचे म्हटले जाऊ शकते. सर्व क्रिकेटप्रेमींना त्याच्या फलंदाजीची आकडेवारी आठवते पण त्याने गोलंदाजी करतानाही अनेकदा संघ जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात भारतीय संघाकडून क्रिकेट खेळला आहे. या दरम्यान त्याने गोलंदाजी करताना आश्चर्यकारक कामगिरी देखील केली आहे. फलंदाजीची आकडेवारी आणि इतर गोष्टी ज्या तुम्हाला सचिन तेंडुलकर बद्दल माहित असतील पण गोलंदाजीत केलेला पराक्रम कमी माहिती असेल.
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत तिन्ही प्रकारामध्ये एकूण २०१ बळी घेतले. या दरम्यान अनेक दिग्गज फलंदाजांना बाद करून त्याने पवेलियनचा रस्ता दाखविला. या लेखात सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सर्वाधिक वेळा बाद केलेल्या फलंदाजांचा उल्लेख केला आहे. कोण असे ५ फलंदाज आहेत ज्यांना सचिन तेंडुलकरने केले आहे आहे सर्वाधिकवेळा बाद, चला जाणून घेऊ.
५. महेला जयवर्धने – (Mahela Jayawardene)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील घातक फलंदाज आणि श्रीलंका संघाचा माजी कर्णधार महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीविरूद्ध बऱ्याचवेळा अडचणीत सापडला होता. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकीर्दीत ३ वेळा महेला जयवर्धनेला बाद केले. सचिन तेंडुलकरने अनेक वेळा महेला जयवर्धनेविरूद्ध गोलंदाजी केली आहे. श्रीलंकेचा हा फलंदाज सचिनच्या गोलंदाजीविरूद्ध अपयशी ठरताना दिसला. सचिन तेंडुलकरसमोर धावा काढण्यात त्याला खूपच अवधी लागला आहे. जयवर्धने अशा खेळाडूंपैकी एक मनाला जातो ज्याच्या फलंदाजीत सातत्य होते. धावा काढण्याच्या त्याच्या तंत्राला उत्तर नव्हते. अधिक जोमाने खेळण्याऐवजी जयवर्धने खेळपट्टीवर स्थिर होत चेंडूला सीमाबाहेर पाठवायचा, परंतु सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर त्याला असे करणे कठीण गेले होते.
४. अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga)
श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga) याला सचिनने आपल्या कारकीर्दीत ३ वेळा बाद केले. श्रीलंकेच्या विश्वचषक विजेत्या कर्णधार रणतुंगाने अनुभवी गोलंदाजांची गोलंदाजी आरामात खेळली पण सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीसमोर त्याच काही चाललं नाही. सचिनने त्याला फिरकीच्या जाळ्यात जखडून ठेवलं.
३. अँडी फ्लॉवर (Andy Flower) –
झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर हा खेळाडू क्रीजवर उभे राहिल्यानंतर गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील झिम्बाब्वेच्या महान फलंदाजांमध्ये त्याचे नाव निश्चितच घेतले जाते. मात्र डाव्या हाताच्या या फलंदाजाला सचिन तेंडुलकरसमोर अडचणीचा सामना करावा लागला आहे. सचिनने कारकिर्दीत फ्लॉवरला ४ वेळा बाद केले.
२. ब्रायन लारा (Brian Lara) –
वेस्ट इंडिज संघाचा ब्रायन लारा (Brian Lara) आणि भारतीय संघाचा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे दोघेही उत्तम खेळाडू मानले जातात. आश्चर्याची बाब म्हणजे ब्रायन लारा हा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर अनेकदा बाद व्हायचा. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ब्रायन लाराला ४ वेळा बाद करून पवेलियनचा रस्ता दाखविला आहे. जगातील मोठं-मोठ्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या लाराला सचिनच्या चेंडूवर धावा काढण्यात अडचणी आल्या होत्या.
१. इंजमाम उल हक (Inzamam-ul-Haq)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरविरूद्ध सर्वाधिक वेळा कोणता फलंदाज बाद झाला असेल तर तो पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक (Inzamam-ul-Haq) आहे. इंझमाम जेव्हा खेळपट्टीवर टिकून रहायचा तेव्हा सचिन तेंडुलकरने त्याला बाद केले आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून सचिनने इंझमामला एकूण ७ वेळा बाद केले आहे. खरं तर आश्चर्य म्हणजे सचिन नियमितपणे गोलंदाजी करत नव्हता परंतु इंझमामला सचिनच्या गोलंदाजीसमोर खेळताना खूप त्रास होत होता.
वाचनीय लेख –
…आणि त्या शतकानंतर सचिनसह असंख्य क्रिकेटप्रेमींचे डोळे पाणावले
असे ३ प्रसंग; जेव्हा एखाद्या क्रिकेटरची दुखापत ठरते दुसऱ्याच खेळाडूसाठी वरदान
आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये २ लाखांपेक्षा जास्त धावा करणारे तीन संघ