२०१६ हे कबड्डीसाठी एक चांगले वर्ष ठरले. यात भारतीय कब्बडी एका वेगळ्याच उंचीवर गेली. ३ ऱ्या आणि ४थ्या प्रो-कबड्डी लीगचे २०१६ मध्ये यशस्वी आयोजन झाले. ह्याच वर्षी प्रो-कबड्डीमध्ये महिला संघही सहभागी झाले आणि त्यांची महिला प्रो-कबड्डी लीगचे आयोजन झाले. वर्षाच्या शेवटी कबड्डी विश्वचषकाचं आयोजन भारतात यशस्वी आयोजन करत भारताने हा विश्वचषक जिंकलाही. यात जुन्या अनुभवी चेहऱ्याबरोबर काही नवीन चेहरेही या स्पर्धेत चमकले.
#१ अनुप कुमार:
भारताचा आणि यु मुंबाचा कॅप्टन कूल हा भारतातील कबड्डीचा एक मोठा खेळाडू आहे. २०१६ साली त्याच्याच नेतृत्वाखाली यु मुंबाने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. ९०० रेड आणि ४११ रेड पॉईंट तो मुंबईचा एक मुख्य चेहरा झाला. हरियाणा पोलीस मध्ये इन्स्पेक्टर पदावर काम करत असलेल्या अनुपच्या जीवनात तेव्हा मोठी गोष्ट घडली जेव्हा त्याने त्याने विश्वचषकाची ट्रॉफी जिंकली. जबदस्त रेडर असलेल्या अनुपचे बोनस पॉईंट घ्यायचे कौशल्य अफलातून…
#२ प्रदीप नरवाल
४थ्या आणि ५व्या प्रो-कबड्डी मोसमातील सर्वात महागडा आणि तरुण खेळाडू ठरण्याचा मान प्रदीप नरवाल कडे जातो. प्रो-कबड्डी मध्ये पाटणा पायरेट्स कडून खेळणाऱ्या नरवालच्या जबदस्त खेळाच्या जोरावर पाटणाने दोन मोसमाची विजेतेपद जिंकली आहेत. त्याने विश्वचषकात ७ सामन्यात ४७ रेड पॉईंट मिळवत भारताचा ह्या विश्वचषकातील दुसरा सर्वात यशस्वी रेडर बनण्याचा मान मिळविला.
#३ अजय ठाकूर
२०१६ च्या कबड्डी विश्वचषकामध्ये अजय ठाकरूचा पुनर्जन्म भारतीय कबड्डी चाहत्यांनी पहिला. जुना अजय ठाकरू पुन्हा ह्याच विश्वचषकाच्या रूपाने भारतीय संघाला मिळाला. पहिल्या दोन मोसमात अनुक्रमे १२२ आणि ७९ रेड पॉईंट मिळविणाऱ्या ठाकूरने ३ऱ्या आणि ४थ्या मोसमात ५२ आणि ६३ रेड पॉईंट मिळविले. ह्याच कामगिरीच्या जोरावर त्याने विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळविले. तसेच तोच भारताकडून सर्वात जास्त रेड पॉईंट कामविणारा खेळाडू ठरला. ७ सामन्यात त्याने तब्बल ६४ रेड पॉईंटची कमाई केली.
#४ मनजीत चिल्लर
आधी कुस्तीपटू असणारा, परंतु दुखापतीमुळे कबड्डीपटू झालेला खेळाडू अर्थात मनजीत चिल्लर. भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या मनजीत चिल्लरने प्रो-कबड्डीच्या चार मोसमात तब्बल ४०० पॉइंट्सची कामे केली.सरासरी १०० असणारा मनजीत चिल्लर हा एकमेव खेळाडू सध्या प्रो-कबड्डीमध्ये आहे. बचावामध्ये सर्वोत्तम असणाऱ्या मनजीतने आधी पुणेरी पलटण आणि नंतर भारतीय संघासाठी विश्वचषकात जबदस्त कामगिरी केली आहे. तब्बल २१ खेळाडूंना त्याने बॅड करण्याचा विक्रम त्याने विश्वचषकात केला आहे.