क्रिकेटपटू जितके त्यांच्या क्रिकेट, विक्रम, मैदानातील मजा-मस्ती, वाद यांमुळे चर्चेत असतात, तेवढीच चर्चा त्यांची वैयक्तिक आयुष्याचीही रंगल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूसाठी त्याच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्याचेही महत्त्व अधिक असते. मैदानाव्यतिरिक्त ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतानाही दिसतात. अनेक खेळाडूंसाठी 2022 हे वर्ष आनंदाचे ठरले. काहीजण पहिल्यांदाच वडील बनले, तर काहींना दुसऱ्यांदा वडील बनण्याचे भाग्य लाभले. आता वर्ष संपल्यात जमा आहे. तर यानिमित्ताने आपण 2022मध्ये बापमाणूस बनलेल्या 5 खेळाडूंविषयी जाणून घेऊयात.
असे 5 खेळाडू, जे 2022मध्ये बनले वडील (5 cricketer who became fathers in 2022 see list)
1. युवराज सिंग
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या घरी पहिल्यांदाच चिमुकल्या पावलांचे आगमन झाले. त्याची पत्नी आणि अभिनेत्री हेजल कीच (Hazel Keech) हिने 2022मध्ये गोंडस मुलाला जन्म दिला. हेजलने वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 25 जानेवारी, 2022 रोजी बाळाचे स्वागत केले. युवराजच्या मुलाचे नाव ओरियन कीच सिंग असे आहे. युवराज आणि हेजलच्या लग्नाबद्दल बोलायचं झां, तर या जोडप्यांनी सन 2016मध्ये लग्नगाठ बांधली होती. युवराजने 2017मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
2. मयंक अगरवाल
भारतीय संघाचा फलंदाज मयंक अगरवाल (Mayank Agarwal) हादेखील पहिल्यांदाच वडील बनला. मयंकची पत्नी आशिता सूद (Aashita Sood) हिने 8 डिसेंबर, 2022 मुलाला जन्म दिला होता. याची माहिती मयंकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली होती. यासोबतच मंयकने त्याच्या मुलाच्या नावाचाही खुलासा केला होता. त्याने मुलाचे नाव ‘आयांश’ असे ठेवले आहे. मयंक आणि आशिता यांनी 4 जून, 2018 रोजी संसार थाटला होता.
3. कृणाल पंड्या
या यादीत तिसरे नाव भारतीय संघाचा अष्टपैलू कृणाल पंड्या (Krunal Sharma) याचे आहे. कृणालदेखील याच वर्षी वडील बनला आहे. त्याची पत्नी पंखुरी शर्मा (Pankhuri Sharma) हिने याच वर्षी 24 जुलै रोजी मुलाला जन्म दिला होता. कृणालने त्याच्या मुलाच्या नावाचाही खुलासा केला होता. त्याने त्याच्या मुलाचे नाव कवीर कृणाल पंड्या ठेवले आहे. दोघांनाही चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने 27 डिसेंबर, 2017 रोजी लग्नाची गाठ बांधली होती.
4. रॉबिन उथप्पा
भारतीय संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) हादेखील 2022मध्येच वडील बनला. त्याची पत्नी शीतल उथप्पा (Sheethal Uthappa) हिने यावर्षी 14 जुलै रोजी चिमुकलीला जन्म दिला होता. हे दोघेही दुसऱ्यांता आई-वडील बनले. उथप्पाने त्याच्या मुलीचे नाव ट्रिनिटी थिया असे ठेवले आहे. खरं तर, उथप्पा आणि शीतल यांना एक 5 वर्षांचा मुलगाही आहे. त्याचे नाव नोलान उथप्पा आहे. त्याचा जन्म 2017मध्ये झाला होता. तसेच, या जोडप्याने 2016 रोजी लग्नाची गाठ बांधली होती.
5. ऍडम झम्पा
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ऍडम झम्पा (Adam Zampa) यावर्षीच वडील बनला. त्याची पत्नी हेरियट पामर (Harriet Palmer) हिने 12 जून रोजी मुलाला जन्म दिला होता. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाने सोशल मीडियावरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. विशेष म्हणजे, झम्पाच्या पत्नीने मे 2022मध्ये मातृदिनाच्या दिवशी प्रेग्नंसीची बातमी दिली होती. 30 वर्षीय झम्पा याने 2021मध्ये हेरियटसोबत लग्नगाठ बांधली होती. (5 cricketer who became fathers in 2022 see list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राम राम 2022: यावर्षी टीम इंडियाला मिळाले 5 हिरे; पाहा कशी होती कामगिरी
कमबॅक्स इन 2022! विराटचे शतक, इंग्लंडचे बझबॉल आणि बरचं काही…