---Advertisement---

५ प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि त्यांच्याकडे असलेले पाळीव प्राणी, डेल स्टेनकडे तर…

On: मंगळवार, जुलै 14, 2020 9:00 PM
---Advertisement---

क्रिकेटपटू हे सध्यातरी ट्रेंड सेटर्स आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांचे आणि मीडियाचे लक्ष असते. त्यामुळे त्यांच्या खेळातील कामगिरीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा चर्चा होते. खेळाडूही सोशल मीडियावर विविध पोस्ट करत चर्चांसाठी विषय देतात.

अन्य लोकांसारखे अनेक क्रिकेटपटू हे प्राणी प्रेमी देखील आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी पाळीव प्राणीही पाळले आहेत. त्यांच्याबरोबरील फोटो आणि व्हिडिओ देखील हे क्रिकेटपटू शेअर करत असतात. अशाच ५ क्रिकेटपटूंबद्दल या लेखात आपण जाणून घेऊ ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत.

क्रिकेटपटू आणि त्यांचे पाळीव प्राणी –

५. रविंद्र जडेजा –

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची गणना सध्याच्या सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. एवढेच नाही तर तो उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. त्याने अनेकदा अष्टपैलू कामगिरीने भारताला मोठे विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

जडेजा मैदानाबाहेर त्यांच्या घोड्यांप्रती असलेल्या प्रेमासाठीही ओळखला जातो. जडेजाने त्याच्याकडे घोडे पाळले असल्याचेही सांगितले आहे. त्यातील एका घोड्याचे नाव वीर आहे. जडेजाने त्याच्या घोड्यांच्या प्रेमापोटी उजव्या हातावर घोड्यांचा टॅट्यूही काढला आहे. तो त्याच्या घोड्यांबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर देखील करत असतो.

https://www.instagram.com/p/B3oLixDFD6r/

४. डेल स्टेन –

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीने अनेक फलंदाजांना संघर्ष करायला लावला. १५ वर्षांच्या कारकिर्दीत स्टेनने २६५ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ६९९ विकेट्स घेतल्या आहेत.

क्रिकेटच्या मैदानात फलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा स्टेन मैदानाबाहेर एक मोठा कुत्राप्रेमी आहे. काही मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे त्याच्याकडे ५ कुत्री आहेत. यात लॅब्राडॉर, यॉर्कशायर टेरियर्स या जातीची कुत्री आहेत. स्टेन त्याच्या कुत्र्यांना त्याच्या कुटुंबातील सदस्य समजतो.

https://www.instagram.com/p/BtGolD8lPXO/

३. मिशेल स्टार्क/ एलिसा हेली –

मिशेल स्टार्क आणि एलिसा हेली या क्रिकेटपटू दांपत्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवले आहे. वेगवान गोलंदाज असलेल्या स्टार्कने ४०० पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तर यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेलीने १८९ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ४ शतकांसह ३५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/0lk6FlEqhc/

हे दोघे पती-पत्नी ज्यावेळी क्रिकेट खेळत नसतात तेव्हा अनेकदा त्यांच्या २ कुत्र्यांबरोबर वेळ घालवताना दिसतात. त्यांचे फोटोही अनेकदा ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. ते दोन्ही कुत्र्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात. त्यांच्या कुत्र्यांचे नाव मिली आणि मिस्टी आहे.

https://www.instagram.com/p/BHZVg-hjiVq/

२. केन विलियम्सन – 

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन त्याच्या शानदार फलंदाजीबरोबरच त्याच्या शांत स्वभावासाठीही ओळखला जातो. त्याने आत्तापर्यंत अनेकदा मोठ्या खेळी करत न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिले आहेत.

पण विलियम्सन त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मात्र जास्त कधी वाच्यता करत नाही. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी वेळा चर्चा होते. पण असे असले तरी तो त्याच्या कुत्र्याबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ मात्र अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या कुत्र्याचे नाव सँडी असे आहे.

https://www.instagram.com/p/B-O4UB-nQ87/

१. एमएस धोनी –

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आत्तापर्यंत एका क्रिकेटपटूचे जे काही कारकिर्दीत साध्य करण्याचे स्वप्न असते असे जवळजवळ सर्वकाही साध्य केले आहे. त्याने फलंदाज, कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून आजपर्यंत मोठे यश मिळाले आहे.

भारताचा २ वेळचा विश्वचषक विजेता कर्णधार धोनी हा त्याच्या कुत्र्यांप्रती असलेल्या प्रेमासाठीही ओळखला जातो. त्याच्या घरीही ६ कुत्री पाळले आहेत. तो जेव्हाही त्याच्या घरी असतो तेव्हा त्याच्या कुत्र्यांबरोबर वेळ घालवताना दिसतो.

https://www.instagram.com/p/Bm2oLJTndaY/

धोनी सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसला तरी तो अनेकदा त्याच्या कुत्र्यांबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या कुत्र्यांपैकी सॅम ही कुत्री त्याची आवडती असल्याचेही त्याने सांगितले आहे.

वाचनीय लेख –

भारतीय संघाचे सर्वाधिक शिकलेले ७ क्रिकेटर्स; एक आहे इंजीनिअर, तर दुसरा…

वनडे विश्वचषकात बलाढ्य संघांना भारी पडलेले ५ कमकुवत संघ

दारुमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ५ क्रिकेटपटू, टीममधून गमवावी लागली होती जागा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---