आपल्या देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाशी जुळणे आणि अनेक वर्षे संघाचा नियमित खेळाडू बनून राहणे, हे प्रत्येक देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचे स्वप्न असते. एकदा का त्यांना ही संधी मिळाली की, ते आपले उत्कृष्ट देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलण्याच्या तयारीला लागतात. सहसा क्रिकेटमध्ये सलग दमदार प्रदर्शन करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या नावावर अनेक मोठ्या विक्रमांची नोंद असते. त्याच्या या कामगिरीमुळे क्रिकेटर्सच्या गर्दीतही त्याला वेगळी ओळख मिळते.
एवढेच नव्हे तर, काही दिग्गजांच्या दमदार आकडेवारीला पाहता, त्या खेळाडूंचे नाव एखाद्या क्रिकेट स्पर्धेला, स्टेडियमला किंवा स्टेडियममधील काही स्टॅंड्सला देण्यात येते.
क्रिकेटमध्ये जगभरातील वेगवेगळे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. भारतवासी लोकांना भारतीय क्रिकेटपटूंची नावे उच्चारायला सोपी वाटतात. कारण, ती त्यांच्या जीभेवर रुळलेली असतात. प्रत्येक देशातील रहिवास्यांबाबत असंच असतं. पण, काही क्रिकेटपटूंची नावे त्यांच्याच देशातील लोकांना नीट वाचता येत नाहीत इतकी विचित्र असतात. मग त्यांच्या नावाचे शॉर्टकट तयार केले जातात किंवा काही तरी युक्त्या सुचवल्या जातात. उदाहरणार्थ, माजी भारतीय क्रिकेटपटू ‘वाक्कदाई बिक्शेश्वरन चंद्रशेखर’ यांचे नाव क्रिकेटजगतात ‘व्हि. बी. चंद्रशेखर’ म्हणून प्रसिद्ध आहे. तर, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू ‘व्हिव्हिएस लक्ष्मण’ याचे नाव ‘वांगीपुरप्पु वेंकट साई लक्ष्मण’ असे आहे. पण, त्याची ओळख व्हिव्हिएस लक्ष्मण नावाने होते.
याव्यतिरिक्त काही क्रिकेटपटूंच्या नावात काही ना काही अर्थ दडलेला असतो. पण, क्रिकेटविश्वातील काही क्रिकेटपटूंच्या नावांचा खूप वेगळाच योगायोग घडला आहे. या खेळाडूंची नावं जगभरातील काही मोठ्या शहरांच्या नावाशी मिळतीजुळती आहेत.
तर बघूयात, कोण आहेत ते पाच क्रिकेटपटू ज्यांची नावे काही शहरांच्या नावाशी जुळतात (5 Cricketers Name Are As Same As Particular City Name) –
भुवनेश्वर कुमार – ओडिसाची राजधानी ‘भुवनेश्वर’
भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघाचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलपर्यंत त्यांच्या गोलंदाजीची कमाल दिसून येते. भुवनेश्वरने कसोटीत २१ सामन्यात ६३ विकेट्स, वनडेत ११४ सामन्यात १३२ विकेट्स आणि टी२० क्रिकेटमध्ये ४३ सामन्यात ४१ विकेट्स घेतल्या आहेत. तर, आयपीएलमध्ये त्याने ११७ सामने खेळत १३३ विकेट्स चटकावल्या आहेत.
आपल्या स्विंग चेंडू टाकण्याच्या शैलीसाठी ओळखला जाणारा भुवनेश्वर हा मुळात मेरठ, उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. पण, त्याचे नाव हे अगदी ओडिसाच्या राजधानीप्रमाणे आहे. भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी आहे.
हॅमिल्टन मासाकात्झा – न्यूझीलंडमधील शहर ‘हॅमिल्टन’
झिम्बाब्वे संघाचा क्रिकेटपटू हॅमिल्टन मासाकात्झा हा त्याच्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने २०१६सालच्या टी२० विश्वचषकात झिम्बाब्वे संघाचे नेतृत्त्व केले होते. पण, त्याला योग्यरितीने आपली जबाबदारी सांभाळता आली नाही, म्हणून त्याने संघाचे नेतृत्त्वपद सोडले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १० शतकांची नोंद आहे. त्याने कसोटीत ३८ सामन्यात २२२२ धावा केल्या आहेत. तर वनडेत २०९ सामन्यात ५६५८ धावा केल्या आहेत. तसेच टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ६५ सामन्यात १६०० धावांची नोंद आहे.
हॅमिल्टनचे नाव हे त्याच्या देशातील कोणत्या शहराच्या नावाशी मिळते जुळते नाही, तर त्याचे नाव न्यूझीलंडच्या क्रिकेटसाठी प्रसिद्ध असलेल्या एका शहराच्या नावाशी मिळतेजुळते आहे. हे शहर म्हणजे हॅमिल्टन.
चार्ल्स कॉवेंट्री – न्यूझीलंडमधील शहर ‘कॉवेंट्री’
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा उजव्या हाताचा फलंदाज चार्ल्स कॉवेंट्रीचे नाव न्यूझीलंडमधील कॉवेंट्री या शहराशी जुळते आहे. चार्ल्स हा बऱ्याचदा सामन्यांमध्ये यष्टीरक्षण करताना दिसला आहे. त्यामुळे तो फलंदाजीसह यष्टीरक्षणातही तरबेज आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीच्या बळावर इंग्लंडविरुद्ध २००३मध्ये त्याने झिम्बाब्वे संघात पदार्पण केले होते. त्या सामन्यात केवळ ३ धावांवर बाद झालेल्या या फलंदाजाला पुढे काही काळासाठी संघातून बाहेर करण्यात आले. पण, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन केल्यानंतर शानदार कामगिरी केली. वनडेत १६ ऑगस्ट २००९ला बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद १९४ धावांची अफलातून खेळी केली होती. या त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वाधिक धावा आहेत.
जोएल पॅरिस – फ्रान्सची राजधानी ‘पॅरिस’
ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज जोएल पॅरिसचे पूर्ण नाव हे जोएल सॅम्युअल पॅरिस हे आहे. जोएलने हा पश्चिमी ऑस्ट्रेलिया आणि पर्थ स्कॉर्चर्स्र संघाचा सक्रिय खेळाडू आहे. त्याला ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. त्याने २०१६ला भङारताविरुद्धच्या टी२० सामन्यातून ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण केले होते आणि त्याच टी२० मालिकेत त्याने त्याचा शेवटचा टी२० सामना खेळला. केवळ २ टी२० सामने खेळलेल्या जोएलच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका विकेटची नोंद आहे.
असे असले तरी, तो देशांतर्गत क्रिकेटमधील सक्रिय खेळाडू आहे. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १६ सामन्यातील ६७ विकेट्सची नोंद आहे. ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाचे नाव फ्रान्स देशाच्या राजधानीसारखे आहे. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे.
सिडनी बार्न्स – ऑस्ट्रेलियातील शहर ‘सिडनी’
इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू सिडनी बार्न्स यांच्या नावाशी मिळतेजुळते शहर शोधणे क्रिकेटप्रेमींसाठी तर काही सेकंदाचेही काम नाही. ऑस्ट्रेलियातील जगप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या सिडनी शहराच्या नावाशी मिळतेजुळते सिडनी फ्रान्स यांचे नाव आहे.
उजव्या हाताच्या ऑस्ट्रेलियन फलंदाज सिडनी यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्द २७ कसोटी सामने खेळले होते. दरम्यान त्यांनी अफलातून प्रदर्शन करत १८९ विकेट्स चटकावल्या होत्या. १९व्या शतकाच्या सुरुवातीला एवढ्या कमी सामन्यात एवढे जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हती.