क्रिकेटमध्ये अनेकदा असे झाले आहे की एखादा खेळाडू १९ वर्षांखालील क्रिकेट त्याने जन्म घेतलेल्या देशासाठी खेळला आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मात्र तो दुसऱ्याच देशाकडून खेळला आहे. विविध कारणांसाठी खेळाडूंना असे करावे लागले आहे. अशा ५ क्रिकेटपटूंचा घेतलेला हा आढावा-
१. इम्रान ताहीर – ताहीरने २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो २०११ ला दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्यास पात्र ठरला होता.
त्याचा जन्म पाकिस्तानमधील लाहोर शहरात झाला होता. त्यावेळी लाहोरमध्ये लहानाचा मोठा झालेल्या ताहीरने १९ वर्षांखालील क्रिकेट पाकिस्तानकडून खेळले. पण नंतर तो त्याची प्रेयसी आत्ताची त्याची पत्नी सौमय्यासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झाला.
२. कॉलिन डी ग्रँडहोम – न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक मिळवलेला ग्रँडहोम १९ वर्षांखालील क्रिकेट झिम्बाब्वेकडून खेळले आहे. त्याच्या जन्म झिम्बाब्वेमध्ये झाला आहे. पण नंतर २००६मध्ये तो न्यूझीलंडला आला आणि ऑकलंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला. त्याद्वारे त्याने न्यूझीलंड संघातही स्थान मिळवले. न्यूझीलंडकडून कसोटी कारकिर्दीची सुरुवात करतानाच त्याने ४१ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.
३. गॅरी बॅलन्स – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केलेला गॅरी बॅलन्सचा जन्म झिम्बाब्वेमध्ये झाला. तसेच तो लहानाचा मोठाही झिम्बाब्वेमध्येच झाला. त्यामुळे त्याने २००६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले होते.
पण त्यानंतर तो इंग्लंडला स्थायिक झाला. तिथे तो यॉर्कशायरकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला. त्यानंतर त्याने इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातही स्थान मिळवले.
४. ग्रँड एलियट – न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्रँड एलियटचा जन्म दक्षिण आफ्रिकामध्ये झाला. त्याने १९ वर्षांखालील विश्वचषकातही दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. पण नंतर तो न्यूझीलंडला स्थायिक झाला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले.
२०१५ च्या विश्वचषकात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच उपांत्य सामना खेळताना महत्त्वपूर्ण ८४ धावांची खेळी केली होती. पण नंतर २०१६ मध्ये त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
५. जोनाथन ट्रॉट – इंग्लंड संघाकडून खेळलेला दिग्गज फलंदाज जोनाथन ट्रॉटचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. त्यामुळे त्याने १९ वर्षांखालील क्रिकेटही दक्षिण आफ्रिकेकडून खेळले आहे. पण नंतर तो इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाला. त्यामुळे त्याने इंग्लंड संघाकडून कसोटी आणि वनडे क्रिकेट खेळले. २०१५ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
ट्रेडिंग घडामोडी –
जगातील १० वेगवान गोलंदाज, ज्यांना तुम्ही म्हणू शकता स्पीडमशीन
जगातील सर्वात उंच ५ क्रिकेटपटू, पहिल्या क्रमांकावरील क्रिकेटपटू उंची ऐकून व्हाल अवाक्
जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही धावला कोरोना बाधितांच्या मदतीसाठी
अशा क्रिकेट टीम ज्यांच्या नावात येतात प्राण्यांची विचित्र नाव