जागतिक क्रिकेटमध्ये टी२०च्या रुपात मर्यादीत क्रिकेटचे केवळ साडेतीन तासांचे सामने सुरु झाले. २००५साली पहिल्यांदा या प्रकारातील आंतरराष्ट्रीय सामना झाला व त्यानंतर या क्रिकेटच्या लोकप्रियतेने दिवसेंदिवस उंचचउंच शिखर गाठली.
इंग्लंडमध्ये २००३मध्ये टी२० ब्लास्ट नावाची लीग सुरु झाली होती. ही जगातील पहिली व्यावसायिक क्रिकेट लीग म्हणून नावारुपाला आली. यानंतर २००८मध्ये भारतीय क्रिकेट संघटना अर्थातच बीसीसीआयने खाजगी लीगला प्रारंभ केला.
त्यानंतर जवळपास सर्वच देशांनी आपल्या खाजगी क्रिकेट लीगची सुरुवात केली. या लेखात आपण या क्रिकेट लीगबद्दल जाणुन घेणार आहोत. (7 Richest T20 Cricket Leagues in the World.)
१. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League- IPL)
बीसीसीआयची ही व्यावसायिक क्रिकेट लीग २००८मध्ये सुरु झाली. आजपर्यंत या लीगचे एकूण १२ हंगाम झाले आहेत. या लीगमध्ये सध्या ८ संघ सहभागी होतात. यात देशातील तसेच परदेशातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. ही लीग जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. मार्च ते मे महिन्यांच्या दरम्यान ही लीग खेळवली जाते. सरासरी ३५ हजार लोक आयपीएलचा प्रत्येक सामन्याला हजेरी लावतात. एका हंगामात अंदाजे ३५ लाख लोक या लीगचा आनंद प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन घेतात.
या लीगची ब्रॅंड व्यॅल्यु २०१८मध्ये ६.३ बिलीयन डाॅलर होती. तब्बल ८० कोटी रुपये हे प्रत्येक आयपीएल संघ आपल्या खेळाडूंना मानधनापोटी देतो. याचमुळे जवळपास ६९० कोटी रुपये दरवर्षी खेळाडूंच्या मानधनावर खर्च होतात. १६ हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीला बीसीसीआयने ५ वर्षांचे प्रक्षेपणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स इंडियाला विकले आहेत.
२. बीग बॅश लीग (Big Bash League- BBL)
बीगबॅश लीग ही आयपीएल पाठोपाठ जगातील दुसरी श्रीमंत क्रिकेट लीग समजली जाते. २०११ साली सुरु झालेली ही लीग क्रिकेटजगतात अतिशय लोकप्रिय म्हणून ओळखली जाते. बीग बॅशचे आतापर्यंत ८ हंगाम झाले आहेत. याच लीगच्या धर्तीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिलांची विमेन्स बीग बॅश लीग सुरु केली.
थेट प्रक्षेपण हा बीग बॅश लीगचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. नेटवर्क टेनने २०१८पर्यंत या लीगचे हक्क १०० मिलीयन डाॅलरला विकत घेतले होते. त्यानंतर २०१९पासून फाॅक्स स्पोर्ट्स व सेवन नेटवर्ककडे या लीगचे प्रक्षेपणाचे हक्क आहेत. यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या सर्व स्पर्धांचे मिळून त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला १.१२ बीलियन डाॅलर मोजले आहेत. यात देशांर्तगत क्रिकेट, आंतरराष्ट्रीय सामने व बीग बॅश लीगचा समावेश आहे. हे एवढे मोठी रक्कम मोजण्याच एक कारण बीग बॅश लीग हे आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीग बॅश लीगमधील पहिल्या चार संघांना ८९००००० डाॅलर बक्षिसापोटी देते तर संघांना दरवर्षी ६००००० डाॅलर लिलावात खर्च करण्याची मुभा असते. सरासरी २८ हजार प्रेक्षक बीग बॅश लीगचे सामने पाहतात. एकूण १२ लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक एका हंगामात लीगचा आनंद घेतात.
३. नॅटवेस्ट टी२० ब्लास्ट (Natwest T20 Blast)
जगातील सर्वात जुनी व्यावसायिक टी२० लीग म्हणून नॅटवेस्ट टी२० ब्लास्टकडे पाहिले जाते. या स्पर्धेत इंग्लंडमधील तळागाळातील खेळाडूंना संधी देण्याचा मुख्य उद्देश ठेऊन या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
जवळपास १८ संघ या लीगमध्ये भाग घेतात. यात इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाशी संलग्न क्रिकेट संघ सहभागी होतात. या लीगची उलाढाल ४५ मिलीयन डाॅलरची असून २.६ मिलीयन डाॅलर बक्षीसांच्या रुपाने दिली जाते.
युकेच्या स्काय स्पोर्ट्सने टी२० ब्लास्टचे प्रक्षेपणाचे हक्क १२० मिलीयन डाॅलरला विकत घेतले आहेत. या लीगमधील सामने सरासरी २५ हजार प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहतात. एकूण १० लाख लोक हे सामने दरवर्षी पाहतात.
४. पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League-PSL)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०१६मध्ये या लीगची सुरुवात केली. या लीगची पाकिस्तानमधील क्रीडाप्रेमी व आजी माजी खेळाडू आयपीएलशी तुलना करतात. परंतु ही लीग आयपीएलच्या तुलनेत बरीच मागे आहे.
गेली काही वर्ष पाकिस्तानमध्ये कोणताही संघ खेळण्यासाठी येत नसताना प्रेक्षकांना क्रिकेटमध्ये गुंतवूण ठेवण्याचे काम या लीगने २०१६पासून केले.
ही लीग पाकिस्तानमध्ये प्रचंड लोकप्रिय असून तिची २०१७ची ब्रॅंड व्यॅल्यु ३००मिलीयन डाॅलर होती. पहिल्याच हंगामात या लीगला २.६ मिलीयन डाॅलरचा फायदा झाल्याचे पीसीबीने २०१६मध्ये घोषीत केले होते. हबीब बॅंक ही या स्पर्धेची मुख्य प्रायोजक असून त्यांनी २०१९मध्ये या लीगबरोबर तब्बल १४.३ मिलीयन डाॅलरचा करार तीन वर्षांसाठी केला आहे.
दरवर्षी पीसीबी या लीगच्या बक्षीसांवर १ मिलीयन डाॅलर खर्च करते. दरवर्षी प्रत्येक संघाला ७.२ लाख मिलीयन डाॅलर लिलावात खेळाडूंवर खर्च करण्यासाठी ही लीग देते. ३६ मिलीयन डाॅलरला या लीगने प्रक्षेपणाचे हक्क पीटीव्ही व जीओटिव्ही सुपरला देण्यात आले आहेत. या लीगमधील सामने सरासरी २५ हजार प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहतात. एकूण ९.५ लाख लोक हे सामने दरवर्षी पाहतात.
५. कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League- CPL)
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने कॅरेबियन प्रीमियर लीगची सुरुवात २०१३साली केली. टी२० विश्वचषक दोन वेळा टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजमधील क्रिकेटचे वातावरण कॅरेबियन प्रीमियर लीगने जिवंत ठेवले. जगातील सर्व लीगमध्ये वेस्ट इंडिजचे खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असतात. कॅरेबियन प्रीमियर लीगमुळे त्यांना घरची हक्काची लीग मिळाली.
२०१८ साली या लीगची ब्रॅंड व्यॅल्यु १०२ मिलीयन डाॅलर होती. हिरो ही भारतीय टू व्हिलर क्षेत्रातील कंपनी यांची मुख्य टायटल प्रायोजक आहे. या लीगमधील ट्रीबॅंगो नाईट रायडर्स हा संघ कोलकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक असलेल्या शाहरुख खानने विकत घेतला आहे.
दरवर्षी प्रत्येक संघाला ६ लाख मिलीयन डाॅलर लिलावात खेळाडूंवर खर्च करण्यासाठी ही लीग देते. या स्पर्धेत एकूण १ मिलीयन डाॅलरची बक्षीसे दिली जातात. या लीगमधील सामने सरासरी १३ हजार प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहतात. एकूण ६.५ लाख लोक हे सामने दरवर्षी पाहतात.
६. बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League- BPL)
आशिया खंडातील आयपीएल व पीएसएल पाठोपाठ सर्वात लोकप्रिय लीग म्हणून याकडे पाहिले जाते. २०१२मध्ये या लीगचा पहिला हंगाम झाला. यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ३५० कोटी रुपयांचा करार गेम ऑन स्पोर्ट्स ग्रुपबरोबर केला होता.
या लीगमध्ये एकूण ७ संघ भाग घेतात. बीपीएलने २०१६-१७ हंगामात स्पोंन्सर्सकडून २.६ मिलीयन डाॅलर कमावले होते. त्यांनी या हंगामात सर्व मिळून एकूण ५१ मिलीयन डाॅलरची उलाढाल केली होती. जीटीव्ही व मासरंगा टीव्ही हे या लीगचे प्रक्षेपण करतात. यासाठी त्यांनी २०१७साली ७६ मिलीयन डाॅलर मोजले आहेत. या स्पर्धेत एकूण १.५ मिलीयन डाॅलरची बक्षीसे दिली जातात.
या लीगमधील सामने सरासरी २४ हजार प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहतात. एकूण ९ लाख लोक हे सामने दरवर्षी पाहतात.
आयपीएल स्पर्धेवरील काही खास लेख
–विशेष लेख: खरंच गेल्या १२ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै
–जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
–आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…
–आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
–आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
–या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
–आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू