जर कामगिरी चांगली झाली नाही तर आयपीएलमध्ये चालु हंगामात कर्णधार बदलले जातात. अगदी शेवटचे काही सामने बाकी असतानाही कर्णधारांची गच्छंती होतं असते. काही संघ असेचही आहे ज्यांनी आयपीएलच्या या हंगामांमध्ये १० पेक्षाही अधिक वेळा कर्णधार बदलले आहेत. तर काही खेळाडू असेही आहेत जे अनेक संघाचे कर्णधार राहिले आहेत.
कुमार संगकारा, माहेला जयवर्धने व स्टिव स्मिथ हे खेळाडू तर तीन संघाचे कर्णधार राहिले आहेत. संगकारा हा डेक्कन चार्जेस, किंग्ज ११ पंजाब व सनरायझर्स हैद्राबाद, माहेला जयवर्धने हा दिल्ली डेअरडेविल्स, किंग्ज ११ पंजाब व कोची टस्कर्स केरळा, तर स्टिव स्मिथ हा पुणे वाॅरियर्स, रायसिंग पुणे सुपरजायंट्स व राजस्थान राॅयल्सचा कर्णधार राहिला आहे.
संघामध्ये किंग्ज ११ पंजाब व दिल्ली कॅपिटल्स संघाने तब्बल ११ वेळा कर्णधार बदलले आहेत. हे दोनही संघ आयपीएलचे सर्व हंगाम खेळले आहेत.
किंग्ज ११ पंजाबकडून आजपर्यंत गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, डेविड वाॅर्नर, दिनेश कार्तिक, माहेला जयवर्धने, श्रेयस अय्यर, झहीर खान, केविन पीटरसन, जेपी ड्युमिनी, जेम्स होप व करुण नायर यांनी कर्णधार पदाची धुरा वाहिली आहे.
दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्स( पूर्वीचे नाव दिल्ली डेअरडेविल्स) संघाकडून एडम गिलख्रिस्ट, विरेंद्र सेहवाग, कुमार संगकारा, युवराज सिंग, जॉर्ज बेली, माहेला जयवर्धने, आर अश्विन, ग्लेन मॅक्सवेल, डेविड हसी, मुरली विजय व डेविड मिलर यांनी कर्णधारपद भुषविले आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैद्राबाद संघ असून त्यांनी ७ वेळा कर्णधार बदलले आहे. २०१२ पासून हा संघ आयपीएल खेळत असून ८ वर्षांत त्यांनी ७ कर्णधार बदलले आहे. त्यात कुमार संगकारा, डेविड वाॅर्नर, केन विलीयन्सन, कॅमेराॅन व्हाईट, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार व डॅरेन सॅमी या मोठ्या नावांचा समावेश आहे.
सर्वाधिक कर्णधार असणारे आयपीएल संघ (सध्या खेळत असलेल्या आयपीएल संघापैकी)-
११ – किंग्ज इलेव्हन पंजाब: गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, डेविड वाॅर्नर, दिनेश कार्तिक, माहेला जयवर्धने, श्रेयस अय्यर, झहीर खान, केविन पीटरसन, जेपी ड्युमिनी, जेम्स होप व करुण नायर
११- दिल्ली कॅपिटल्स: एडम गिलख्रिस्ट, विरेंद्र सेहवाग, कुमार संगकारा, युवराज सिंग, जॉर्ज बेली, माहेला जयवर्धने, आर अश्विन, ग्लेन मॅक्सवेल, डेविड हसी, मुरली विजय व डेविड मिलर
७- सनरायझर्स हैद्राबाद: कुमार संगकारा, डेविड वाॅर्नर, केन विलीयन्सन, कॅमेराॅन व्हाईट, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार व डॅरेन सॅमी
आयपीएल स्पर्धेवरील काही खास लेख
–विशेष लेख: खरंच गेल्या १२ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै
–जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
–आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…
–आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
–आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
–या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
–आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू