क्रिकेट आणि क्रिकेटपटूंना वेळेबरोबर मिळालेल्या यशाचे स्तर दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसुन येत आहे. क्रिकेट खेळण्याच्या शैलीत जसा बदल होत आहे तसा क्रिकेटपटूंच्या राहणीमानामध्ये देखील बदल दिसून येत आहे. त्याचबरोबर क्रिकेट जसजसे श्रीमंत झाले तसतसे क्रिकेटबोर्डही श्रीमंत झाले आहेत. १९७५ साली कुठेच नसणारे भारताचे क्रिकेट बोर्ड आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड झाले आहे. ज्यामुळे मागील काही वर्षात खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनातही वाढ झालेली दिसून आली आहे. मात्र तरीही काही खेळाडू असे आहेत ज्यांना क्रिकेट खेळुन चांगले पैसे कमवूनही निवृत्तीनंतर गरीबीला तोंड द्यावे लागले. चला तर पाहुया असे कोणते खेळाडू आहेत ज्यांना आता अठरा विश्व दारिद्रय पहावे लागत आहे.
१. मॅथ्यु सिनक्लेयर
मॅथ्यु सिनक्लेयर याने न्युझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१३ साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृती घेतली आहे. न्युझीलंडसाठी त्याने ३३ कसोटी, ५४ एकदिवसीय तर २ टी२० सामने खेळले आहेत. निवृतीनंतर मात्र त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सिनक्लेयर सध्यस्थितीत एका रियल इस्टेट कंपनीमध्ये काम करतो.
२. ख्रिस केर्न्स
विश्वक्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्म अष्टपैलु खेळाडूंपैकी एक म्हणजे ख्रिस केर्न्स. ख्रिस केर्न्सने १९८९ ते २००६ सालपर्यंत न्युझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. न्युझीलंडसाठी त्याने ६२ कसोटी, २१५ एकदिवसीय तर २ टी२० सामने खेळले आहेत. २००६ साली निवृत्ती घेतल्यानंतर हिऱ्यांचा व्यापार सुरु केला ज्यामध्ये त्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यानंतर परिवाराला सांभाळण्याने साठी त्याने ट्रक धुण्याचे व चालवण्याचे कामदेखील केले. मात्र त्याला आता एका जीवघेण्या आजाराने त्रासले आहे.
‘Cricket is obviously something deep in your soul for it to be the first thing you wanted to say after all that trauma…the thing you most wanted to remember.’ Thank you to the @NZCPA for all that you do and all that you have done for my family. ????https://t.co/YS3YPXT0HV pic.twitter.com/WlTNEcHHtO
— Chris Cairns (@chriscairns168) September 28, 2021
३.अरशद खान
अरशद खान याने पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने पाकिस्तानमध्ये आपल्या फिरकीच्या जोरावर भरपुर नाव कमावले होते. त्याने पाकिस्तानसाठी त्याने ९ कसोटी आणि ५८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला अनुक्रमे प्रत्येकी ३२ आणि ५६ बळी मिळाले. निवृत्ती घेतल्यानंतर मात्र त्याच्यावर इतकी वाइट परिस्तिथी आली की त्याला टॅक्सी चालवण्याचे काम करावे लागले. ज्यामुळे त्याचे जीवन पुन्हा स्थिरावले.
४.ऍडम हॅलिओके
इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणारे ऍडम हॅलिओके यांना आपल्या वेळेचे सर्वश्रेष्ठ अष्टपैलु खेळाडु म्हणले जाते. जेव्हा ऍडमने निवृत्ती घेतली तेव्हा त्याला मोठ्या आर्थिक तंगीला सामोरे जावे लागले. त्याने मिश्र मार्शल आर्टस मध्ये काम करत आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केले.
५. जनार्दन नवले
भारताच्या स्वातंत्रपुर्व काळातील भारतीय संघाचे जनार्दन नवले हे सदस्य होते. त्यांनी भारताच्या क्रिकेट इतिहासातील १९३२ सालच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला चेंडू खेळला होता. त्यांनी भारतासाठी केवळ २ कसोटी खेळल्या ज्यामध्ये त्यांनी ४२ धावा केल्या आहेत. क्रिकेटमधुन निवृत्ती घेतल्यानंतर आर्थिक संकटामुळे मात्र त्यांना एका चीनी मीलमध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणुन काम करावे लागले. ७ सप्टेंबर १९७९ मध्ये त्यांचे निधन झाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाद केल्यानंतर फलंदाजाच्या गळ्यात पडून केले सेलेब्रेशन, शमी पुजाराची मैत्री एकदा बघाच
लग्नाआधीच ‘बाप’ बनणार इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज, वाचा सविस्तर
टीम इंडियाला दिलासा, विराट-रोहितचा घाम काढणारा इंग्लिश गोलंदाज वनडे, टी२० मालिकेला मुकणार?






