---Advertisement---

लग्नाआधीच ‘बाप’ बनणार इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज, वाचा सविस्तर

On: शुक्रवार, जून 24, 2022 4:57 PM
England-Cricket-Team
---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड शुक्रवारी (२४ जून) त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. दोन दिवसांपूर्वी ब्रॉडने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा एक फोटो स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून इंग्लंडच्या या दिग्गजाने चाहत्यांसाठी एक आनंदीची बातमी सांगितली आहे.

ब्रॉडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव मॉली किंग (Stuart Broad Wife Mollie King) असे आहे. अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून त्याने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये मॉली किंग गरोधर असल्याचे दिसत आहे. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) गुडघ्यांवर खाली बसून मॉलीच्या गर्भाला किस करताना दिसत आहे.

लग्नाच्या आधिक मॉली किंगने दिली आनंदाजी बातमी

स्टुअर्ट ब्रॉड आणि मॉली किंग यांचे हे पहिले आपत्य आहे. मॉली किंग यापूर्वी रेडिओ १ मध्ये जॉकीचे काम करत होती. तिचे वय सध्या ब्रॉडपेक्षा एक वर्षाने कमी म्हणजेच ३५ वर्ष आहे. मागच्या वर्षाच्या सुरुवातीला या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. परंतु अद्याप त्यांनी लग्न केले नाहीये. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने सांगितले होते की, आम्ही मागेच लग्न करणार होते, पण काही कारणास्तव ते नियोजनक रद्द केले गेले होते.

ब्रॉडची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉड नेहमीच इंग्लंड संघासाठी (England Cricket Team) एक महत्वाचा खेळाडू राहिला आहे. एवढेच नाही जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांमध्येही त्याचा उल्लेख केला जातो. त्याने इंग्लंडसाठी २००६ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पदार्पणाच्या एवढ्या वर्षांनंतर देखील तो इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करतो. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन ही वेगवान गोलंदाजांची जोडी, इंग्लंडसाठी कोणताही कठीण सामना जिंकण्याची धमक ठेवतात. ब्रॉडने तापर्यंत १५४ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ५६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे ५४६, १७८ आणि ६५ अशा विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

यश दुबेने शतकी तडाख्यासह मुंबईला दिले प्रत्युत्तर, मग ‘राहुल फेम’ सेलिब्रेशन करत वेधले साऱ्यांचे लक्ष

सराव सामन्यातही वाद, पंचांनी चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्यानंतर संतापला विराट; मैदानातच विचारला जाब

विराट कोहलीने जो रूटच्या ‘मॅजिक ट्रिक’ची नक्कल करण्याचा केला प्रयत्न, पण शेवटी झालं हसू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---