---Advertisement---

क्रिकेटला 2023मध्ये गुडबाय म्हणणारे 5 खेळाडू, यादीत 2 भारतीयांचाही समावेश

Aaron-Finch-And-Hashim-Amla
---Advertisement---

क्रिकेटविश्वासाठी 2023 हे वर्ष जितके चांगल्या आठवणी तयार करतंय, तितकेच मोठे धक्केदेखील देत आहे. नवीन वर्ष अनेकांसाठी चांगले ठरले. काही खेळाडूंनी संसार थाटला, काही संघांनी सलग मालिका जिंकल्या, जसे की, भारतीय संघ. तसेच, काही खेळाडूंनी घेतलेल्या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना धक्काही दिला. तो निर्णय होता निवृत्तीचा. आधी दक्षिण आफ्रिका, भारत आणि आता ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. या लेखातून आपण अशा 5 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी 2023मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. विशेष म्हणजे, या यादीत 2 भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

ऍरॉन फिंच
मंगळवार (दि. 7 फेब्रुवारी) उजाडला आणि ऑस्ट्रेलियाचा टी20 संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) याने सर्वांनाच धक्का दिला. फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत एकच खळबळ माजवली. फिंच हा ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक होता. त्याने संघाला 2021 सालच्या टी20 विश्वचषकाची ट्रॉफीही जिंकून दिली होती.

फिंचच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 5 कसोटीत सामने खेळताना 27.8च्या सरासरीने 278 धावा केल्या होत्या. 146 वनडे सामने त्याने 38.89च्या सरासरीने 5406 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त 103 टी20 सामने खेळताना 34.29च्या सरासरीने 3120 धावा चोपल्या आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक 172 धावांचीही नोंद आहे.

जोगिंदर शर्मा
भारतीय संघाला 2007चा टी20 विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणजे जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) होय. जोगिंदरने शुक्रवारी (दि. 3 फेब्रुवारी) रोजी आंतरराष्ट्रीयसोबतच देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती.

विशेष म्हणजे, 2007साली जोगिंदरच्या विश्वचषकातील प्रदर्शनामुळे त्याला हरियाणा सरकारने डीएसपीपदी नियुक्त केले होते. जोगिंदरने भारताकडून 4 वनडे आणि 4 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने यादरम्यान वनडेत 1, तर टी20त 4 विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त वनडेत त्याने 35 धावा केल्या होत्या, तर टी20त त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

मुरली विजय
भारतीय संघाचा माजी सलामीवीर मुरली विजय (Murali Vijay) याने 30 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने भारतीय संघासाठी 61 कसोटी, 17 वनडे आणि 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याच्या नावे अनुक्रमे 3982, 339 व 169 धावा आहेत. भारताने जिंकलेल्या 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी वेळी तो संघाचा सदस्य होता.

https://www.instagram.com/p/CoCMn_ZvUPo/?hl=en

अशात विजयचे भारतीय क्रिकेट सोबतचे संबंध संपल्याने तो आता काही व्यावसायिक क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसू शकतो

हाशिम आमला
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू हाशिम आमला (Hashim Amla) यानेदेखील याचवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने 18 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. 39 वर्षीय आमला हा दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.

आमलाने 124 कसोटी सामने खेळताना 46.64च्या सरासरीने 9282 धावा केल्या होत्या. 182 वनडे सामने खेळताना त्याने 49.46च्या सरासरीने 8113 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त 44 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 33.60च्या सरासरीने 1277 धावा केल्या होत्या. त्याच्या नावावर एकूण 55 आंतरराष्ट्रीय शतकांचा समावेश आहे.

ड्वेन प्रिटोरियस
यावर्षी सर्वप्रथम निवृत्ती घेणारा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस (Dwaine Pretorius) होय. प्रिटोरियस याने 9 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो 2019च्या वनडे आणि 2021च्या टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघाचा भाग होता.

प्रिटोरियस याने 3 कसोटी सामने खेळताना 7 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने 27 वनडे सामने खेळताना 35 विकेट्स नावावर केल्या होत्या. याव्यतिरिक्त 30 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना त्याने 35 विकेट्स घेतल्या होत्या. 17 धावा देत 5 विकेट्स ही त्याची टी20तील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. (5 cricketers who retired in 2023 two indians include in this list)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार ऍरॉन फिंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
विश्वचषकात पाकिस्तानला भिडण्यापूर्वी मितालीचा टीम इंडियाला सल्ला; म्हणाली, ‘वरची फळी फॉर्मात, पण…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---