नवीन वर्ष 2023 हे भारतीय संघासाठी आनंदाचे वर्ष ठरत आहे. कारण, या वर्षाची सुरुवातच भारतीय संघाने दमदार विजय मिळवत केली आहे. यावर्षात आतापर्यंत झालेल्या द्विपक्षीय मालिकांमध्ये भारताचेच नाणे खणकले आहे. विशेष म्हणजे, भारताने नवीन वर्षात इतिहास रचला आहे. हा विक्रम करण्यासाठी भारताला 2023 उजाडावे लागले. याव्यतिरिक्त भारत द्विपक्षीय मालिकेचा ‘बादशाह’देखील ठरतोय. चला तर कोणता आहे तो विक्रम जाणून घेऊया.
सामन्याचा आढावा
बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा आणि अखेरचा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 234 धावा चोपल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव 12.1 षटकातच गडगडला. त्यांना यावेळी सर्व विकेट्स गमावत फक्त 66 धावा करता आल्या. यासोबतच भारताच्या नावावर विक्रमही रचला गेला.
????.????.????.????.????.????.????! ????#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/130FFN6Xhr
— BCCI (@BCCI) February 1, 2023
भारतीय संघाचे विक्रम
न्यूझीलंडला 66 धावांवर पराभूत करताच भारताने तब्बल 168 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कधीच एवढा मोठा विजय मिळवला नव्हता. त्यामुळे न्यूझीलंडला धूळ चारताच भारताने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांनी विजय मिळवण्याचा पराक्रम गाजवला. हे झाले आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील.
WHAT. A. KNOCK ????
A maiden T20I century for Shubman Gill ????#INDvNZ | ????: Scorecard: https://t.co/CR0CCRQdoZ pic.twitter.com/2etTJZKiUj
— ICC (@ICC) February 1, 2023
दुसरीकडे, भारताने या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांनी केली होती. श्रीलंका संघ 3 सामन्यांच्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतात आला होता. त्यावेळी भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात 15 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम येथे तिसरा वनडे सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या मोबदल्यात 390 धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान पार करताना श्रीलंका संघाचा डाव 22 षटकात 73 धावांवरच संपुष्टात आला होता.
त्यामुळे भारतीय संघाने हा सामना तब्बल 317 धावांनी आपल्या नावावर केला होता. हा भारतीय संघाने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांनी मिळवलेला मोठा विजय होता.
भारत 2023मध्ये सुसाट!
भारतीय संघाने 2023 वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध केली. भारत आणि श्रीलंका संघात 3 सामन्यांची टी20 आणि वनडे मालिका खेळवली गेली. टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. त्याआधी भारताने पहिला टी20 सामना जिंकला होता. त्यानंतर तिसरा टी20 सामनाही जिंकत मालिका 2-1 अशा फरकाने खिशात घातली होती. त्यानंतर वनडे मालिकेत भारताने श्रीलंकेला एकही विजय मिळवू दिला नाही. भारताने तिन्ही सामन्यात विजय मिळवत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला होता.
यानंतर भारताने न्यूझीलंड संघाचा सामना केला. न्यूझीलंड संघदेखील 3 सामन्यांच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. यातील वनडे मालिकेत भारताने न्यूझीलंडला विजयाची एकही संधी दिली नाही. भारताने न्यूझीलंडविरुद्धचे तिन्ही वनडे सामने खिशात घालत मालिका नावावर केली. त्यानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत संघर्ष करावा लागला. पहिल्या वनडेत न्यूझीलंडने पराभूत केल्यानंतर भारताने दुसरा सामना कसाबसा जिंकला. त्यानंतर तिसऱ्या टी20त भारताने मोठे आव्हान उभे करत न्यूझीलंडवर दबाव आणला. तसेच, त्यांच्या झटपट विकेट्स काढत टी20तील सर्वात मोठा विजय मिळवला. या मालिकेत क्लीन स्वीप मिळवता आला नसला, तरीही भारताने मालिका 2-1ने खिशात घातली. यावरून भारत द्विपक्षीय मालिकेचा ‘बादशाह’ आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. (In 2023 across formats indian create history read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शानदार! आतापर्यंत जो शानदार विक्रम रैनाच्या नावावर होता, तोही शुबमनने घेतला हिसकावून
मन कसं जिंकायचं हे पंड्याने दिलं दाखवून! मालिका खिशात घालताच संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूकडे सोपवली ट्रॉफी