टी२० क्रिकेट हे तसे नवे क्रिकेट. त्यातही हा प्रकार वेगवान असल्याने व षटकांची संख्या कमी असल्याने फारच कमी वेळा फलंदाजांना शतकी खेळी करण्याची संधी मिळते.
या प्रकारात आजपर्यंत जगातील २०७९ क्रिकेटपटू सामने खेळले आहेत. यातील ४२ खेळाडूंनी कारकिर्दीत एकतरी शतक केले आहे.
भारताचा रोहित शर्मा हा या प्रकारात ४ शतके करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. तर काॅलीन मुन्रो व ग्लेन मॅक्सवेल या फलंदाजांनी या प्रकारात प्रत्येकी तीन शतके केली आहेत.
परंतु या प्रकारात काही असे फलंदाजही खेळले आहेत ज्यांनी शतकी खेळी करण्यात अपयश आले आहे परंतु त्यांनी शानदार अर्धशतकी खेळी केल्या आहेत. 5 cricketers with highest number of fifties without a century in the T20i format.
४. ऑयन माॅर्गन (१३ अर्धशतके) (Eoin Morgan)
इंग्लंडचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऑयन माॅर्गन हा जगातील एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यालाही टी२० प्रकारात शतकी खेळी करता आलेली नाही. माॅर्गनने ८९ टी२० सामन्यात ३०.९८ च्या सरासरीने २१३८ धावा केल्या आहेत. यात त्याने १३ अर्धशतकेही केली आहेत. परंतु त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ९१ राहिली आहे.
३. बाबर आझम (१३ अर्धशतके) (Babar Azam)
पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू, ज्याची सतत तुलना ही विराटशी होते त्या बाबर आझमलाही विराटप्रमाणेच टी२० प्रकारात शतकी खेळी करता आलेली नाही. बाबरने ३८ टी२० सामन्यात ५०.७२च्या सरासरीने १७४१ धावा केल्या आहेत. यात त्याने १६ अर्धशतकेही केली आहेत. परंतु त्याची सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद ९७ राहिली आहे.
२. पाॅल स्टर्लिंग (१८ अर्धशतके) (Paul Stirling)
आयर्लंडचा स्टार क्रिकेटपटू स्टर्लिंगने ७८ टी२० सामन्यात २९.९१च्या सरासरीने २१२४ धावा केल्या आहेत. यात त्याने १८ अर्धशतकेही केली आहेत. परंतु त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ९५ राहिली आहे.
१. विराट कोहली (२४ अर्धशतके) (Virat Kohli)
भारताचा कर्णधार विराट कोहलीने या प्रकारात ८२ सामन्यात तब्बल ५०.८०च्या सरासरीने २७९४ धावा केल्या आहेत. या प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल आहे. परंतु त्याला अजूनही यात शतकी खेळी करता आलेली नाही. त्याने या प्रकारात २४ अर्धशतके केली आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद ९४ राहिली आहे. त्याने ५ वेळा यात ८०पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं
-सचिनला आऊट झाला की हा खेळाडू करायचा रडायला सुरुवात
-आणि युवराजने बसमधील सिटवर बसलेल्या रोहितला उठवले
-कसोटी, वनडे व टी२० प्रकारात ५०पेक्षा जास्त सरासरी असलेले खेळाडू