भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मंगळवारी (१६ नोव्हेंबर) पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी तो त्याच्या मनगटी घड्याळांमुळे चर्चेत आला आहे. त्याची महागडी घड्याळे मुंबई विमानतळावर जप्त झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि एकच चर्चा सुरू झाली. आधीच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्या ५ कोटींची घड्याळे घेऊन मुंबई विमानतळावर पोहोचला होता, ज्याची कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे त्याची घड्याळे जप्त करण्यात आली होकी. मात्र, नंतर हार्दिक पांड्याने स्वतः एक निवेदन जारी करून या संपूर्ण प्रकरणावर खुलासा केला.
हार्दिक पांड्याने सांगितले की, तो दुबईहून दोन महागड्या पाटेक फिलिप घड्याळे (किंमत १.५ कोटी) आणत होता, ज्यासाठी तो कर रक्कम भरण्यासाठी सीएसएमआय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाकडे पोहोचला होता. अहवालानुसार, त्याच्या खरेदीच्या पावत्यांचे अनुक्रमांक घड्याळाच्या पावत्यांशी जुळत नव्हते.
हार्दिक पांड्याने या घड्याळांची किंमत १.८ कोटी, तर दुसऱ्याची १.४ कोटी आणि एका घड्याळाची किंमत ४० लाख सांगितली आहे. माहितीनुसार, पांड्याला अनुक्रमांकातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पुरावे सादर करावे लागतील आणि जर तो तसे करण्यात अयशस्वी ठरला तर सीमाशुल्क विभाग त्याची घड्याळे जप्त करू शकते. हार्दिक पांड्याला या घड्याळांवर ३८ टक्के कर भरावा लागणार आहे. हार्दिक पांड्याला महागडी घड्याळे घालण्याचा छंद आहे आणि त्याच्याकडे आधीच करोडो रुपयांची घड्याळे आहेत. हार्दिक पांड्याच्या घड्याळांच्या संग्रहावर एक नजर टाकूया.
१. पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११
हार्दिक पांड्या इंग्लंडच्या दौऱ्यावर त्याच्या नव्या घड्याळासह दिसला होता. ज्याचे मॉडेल पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११ आहे. हे घड्याळ पूर्णपणे प्लॅटिनमचे बनलेले आहे. या घड्याळावरील तासाचे चिन्ह देखील पाचूचे बनलेले आहेत, ज्यामुळे डायलची रचना आकर्षक दिसते. यातील ५७११ मालिकेतील घड्याळं खूप दुर्मिळ आहेत. पण या घड्याळांची किंमत ५ कोटींच्या वर आहे.
२. पॅटेक फिलिप नॉटिलस १८ कॅरेट व्हाइट गोल्ड
या यादीतील दुसरे घड्याळ म्हणजे, पॅटेक फिलिप नॉटिलस १८ कॅरेट व्हाइट गोल्ड. हे घड्याळ देखील हार्दिक पंड्याच्या मालकीचे आहे. पॅटेक फिलिप घड्याळे सहज मिळत नाहीत. आयपीएल २०१९ मध्ये हार्दिक पांड्या पहिल्यांदाच हे घड्याळ घालतांना दिसला होता. या घड्याळात २५५ हिरे आहेत. १८ कॅरेट गोल्ड डायल प्लेटच्या या घड्याळाची किंमत २.७ कोटी रुपये आहे.
३. पॅटेक फिलिप नॉटिलस ५७१ आर
हार्दिक पांड्याचे हे घड्याळ एका फोटोशूट दरम्यान दिसले होते. हार्दिक पांड्याच्या घड्याळाचे हे मूळ मॉडेल हिरे जडलेले नव्हते, पण हार्दिक पांड्याने त्याचे घड्याळ आपल्या सोईनुसार बनवून घेतले आहे आणि त्यामुळे या घड्याळाची किंमत वाढली. हार्दिक पांड्याच्या या घड्याळाची किंमत १.६५ कोटी आहे.
४. रोलेक्स ऑयस्टर पर्पेच्युअल डेटन कॉस्मोग्राफ
हार्दिक पांड्याचे हे घड्याळ लॉकडाऊनदरम्यान त्याच्या हातात दिसले होते. या घड्याळाची किंमत एक कोटी रुपये आहे. हे घड्याळ १८ कॅरेट यलो डायलमध्ये बनले आहे. यात ३६ ट्रॅपीझ कट डायमंड आणि २४३ अतिरिक्त डायमंड लावण्यात आले आहेत.
५. ऑडेमर्स पिगुएट रॉयल ओक सेल्फवाइंडिंग क्रोनोग्राफ रोज गोल्ड
हार्दिक पांड्याच्या या घड्याळाची किंमत ३८ लाख रुपये आहे. या घड्याळात १८ कॅरेट सोन्याचे काम करण्यात आले आहे. ज्यामध्ये सोन्याचे टोन्ड कोटिंग करण्यात आले आहे. हार्दिक पांड्याच्या घड्याळ संग्रहात असे घड्याळ असणे नवल नाही. हार्दिक पांड्याला महागड्या महागड्या घड्याळांसोबत महागड्या गाड्यांचा देखील छंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अविस्मरणीय षटकार! विश्वचषकातील तीन सिक्स जे भारतीय प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत
टी२० विश्वचषक २००७ च्या फायनलमधील स्कूप शॉट पुन्हा टीव्हीवर पाहून मिस्बाह उल हकने दिली ‘अशी’ रिऍक्शन
‘ही २००७ ची गोष्ट आहे…’, रोहितने द्रविडच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या पदार्पणाच्या आठवणींना दिला उजाळा